भाजपाने खोटी आश्वासने देऊन केवळ भुलथापा मारल्या : संजोग वाघेरे पाटील

मिलिंद संधान 
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

नवी सांगवी (पुणे)  "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भोगणाऱ्या भारतीय जनता पार्टीने केवळ खोटी आश्वासने देऊन लोकांना भुलथापा मारल्या आणि पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ करून जनतेला अच्छे दिनाचे गाजर दाखविले. त्यामुळे सर्व आघाड्यांवर नापास झालेल्या सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. "असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सांगवी येथे काढले.

केंद्र, राज्य व महापालिकेने केलेल्या भाववाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सांगवी पिंपळे गुरव परिसरात दुचाकी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोर्चाच्या समारोप प्रसंगी कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना उद्देशून बोलताना त्यांनी आपले विचार मांडले. 

यावेळी नगरसेवक नाना काटे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, फजल शेख, शाम जगताप, शिवाजी पाडुळे, तानाजी जवळकर, महेश भागवत, अमर आदियाल, बाळासाहेब पिल्लेवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी बाराच्या दरम्यान सुरू झालेला हा दुचाकी मोर्चा सांगवी पिंपळे गुरवच्या महत्वाच्या रस्त्यांवरून भाजपा सरकारचा निषेध करीत सांगवी येथील करसंकलन कार्यालयावर पोहचल्यावर तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ यावेळी येथे दुचाकीला प्रतिकात्मक फाशी देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा करणारा अहमदनगरचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्याला जोडेमारून त्याचे दहन करण्यात आले.

वाघेरे पाटील म्हणाले, "सर्वात कमी पाणीपट्टी आकारणारी आपली महानगरपालिका होती, परंतु यावर्षी त्याला भाववाढ सुचविली आहे. जोपर्यंत शास्तीकर माफ करीत नाही व अनाधिकृत बांधकामे नियमित करीत नाही तो पर्यंत मोर्चे काढून याचा निषेध करीत रहाणार." 

राष्ट्रवादी पक्षाकडून मोठमोठी पदे भोगून झाल्यावर अनाधिकृत बांधकामे नियमित व शास्तीकर रद्द करण्यासाठी काहींनी राष्ट्रवादी पक्ष सोडला. ऐनवेळी भाजपात जाऊन त्यांनी आमदारकी मिळविली व शहराध्यक्षही झाले पण आता साडेतीन वर्षे झाल्यानंतरही ना शास्ती माफ झाला ना 2015 पर्यंतची अनाधिकृत बांधकामे नियमित झाली. अशी टिका प्रशांत शितोळे व राजेंद्र जगताप यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता केली. 

Web Title: Marathi news pune news bjp rashtravadi rally