दृष्टिहीन विद्यार्थ्यांना डोळस विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

संदिप जगदाळे
शनिवार, 10 मार्च 2018

हडपसर (पुणे) : कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेचे वसतिगृह आणि संत गाडगे महाराज शाळेतील दहावीच्या परिक्षेला बसलेल्या दृष्टिहिन विद्यार्थ्यांना लेखनीक (रायटर) म्हणून येरवडा येथील ग्येनबा सोपानराव मोझे प्रशालेतील विद्यार्थी मदत करत आहेत. त्यामुळे दृष्टिहिन विद्यार्थ्यांची लेखनिकाची समस्या सुटली आहे. 

हडपसर (पुणे) : कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेचे वसतिगृह आणि संत गाडगे महाराज शाळेतील दहावीच्या परिक्षेला बसलेल्या दृष्टिहिन विद्यार्थ्यांना लेखनीक (रायटर) म्हणून येरवडा येथील ग्येनबा सोपानराव मोझे प्रशालेतील विद्यार्थी मदत करत आहेत. त्यामुळे दृष्टिहिन विद्यार्थ्यांची लेखनिकाची समस्या सुटली आहे. 

बंडगार्डन रस्त्यावरील अंजूमन शाळेतील परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून परीक्षेसाठी दहा दृष्टिहिन विद्यार्थी परीक्षा देत आहेत.  मोझे शाळेतील लेखनिक स्वतःचा अभ्यास बुडवून दृष्टिहिन विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षापासून मदत करत आहेत. त्यामुळे मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची व सहकार्याची जाणीव निर्माण होण्यास मदत होत आहे.

आम्हाला दृष्टिहिन मुलांचे लेखनिख म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला. तसेच या निमित्ताने आमच्याशी नवीन मित्र जोडले गेले. दृष्टिहिन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासबरोबर अनेक कलागुण आहेत. हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत, तसेच ते दिव्यांग असले तरी त्यांच्यातील अत्मविश्सावस आम्हाला प्रेरणा देणारा आहे, अशी प्रतिक्रीया लेखनिक म्हणून काम करणारे शिवम गायकवाड, संकेत खरात, संघराज कदम, ऋगवेद क्षीरसागर, अर्थव पाटील, गौरव देशमुख, साहिल वाघमारे, सार्थक बनकर, जयेश केरकर, अजय जाधव, मयुर कदम, प्रणेश धोत्रे यांनी सकाळ शी बोलताना प्रतिक्रीया दिली.

दृष्टिहिन विद्यार्थी किशोर कांबळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, परीक्षा जवळ आली तरी स्वतःच्या अभ्यासाचा वेळ आमच्य़ासाठी खर्च करून आम्हाला लेखनिक मित्रांनी सहकार्य केले. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋण कधीही विसरू शकत नाही, मोझे शाळेचे अध्यक्ष रामभाउ मोझे, प्राचार्य संजय सोमवंशी, उपप्राचार्य मारूती दसगुडे, प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, विशेष शिक्षक अमृत लोखंडे यांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्याने आम्हाला परिक्षेसाठी लेखनिक उपल्बध होवू शकले.

मोझे शाळेचे प्राचार्य संजय मोहिते म्हणाले, गेल्या दहावर्षापासून आमची संस्था दृष्टिहिन विद्यार्थ्यांना लेखनिक महणून मदत करते. विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो तरीही विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवत आहोत. शाळेत मुलांना पुस्तकी शिक्षण दिले जाते, मात्र त्यांना जीवन शिक्षण देणे महत्वाचे आहे. यासाठीच आमच्या शाळेतील विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करण्यास प्रोत्साहन देतो. यामाध्यमातून मुलांमध्ये त्याग, मदतीची व सहकार्याची भावनाव सामाजिक जाणिव निर्माण होते. त्यांना नवीन मित्र मिळतात. 
 

Web Title: Marathi news pune news blind students helped by normal students