पुस्तक भेटीचा अनोखा सामाजिक उपक्रम

दत्ता म्हसकर
मंगळवार, 16 जानेवारी 2018

जुन्नर (पुणे) : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी अनोख्या सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत. वाढदिवसाला फ्लेक्सबाजी, हारतुरे, भेटवस्तु, शालफेटे यास फाटा देत यासाठी होणारा खर्च टाळून त्या रकमेतून विविध प्रकारची पुस्तके भेट देण्याचे आवाहन शेरकर यांनी वर्तमानपत्र तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले होते. तालुक्यातील जनतेने या संकल्पनेचे स्वागत करत सर्वच क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने पुस्तके भेट दिली. 

या पुस्तकांत स्पर्धा परीक्षा, कृषी, विज्ञान, संस्कार, ऐतिहासिक, आत्मचरित्र, कथा, कांदबरी तसेच विविध प्रकारची हजारो पुस्तके भेट स्वरुपात मिळाली. शेरकर यांनी 2016 साली तालुक्यातील आणे, पेमदरा, नळावणे व इतर टंचाईग्रस्त गावातील जनावरांना चारा वाटप करून आपला वाढदिवस पथदर्शी उपक्रमाने साजरा केला होता. या उपक्रमाबाबत बोलताना शेरकर म्हणाले, सर्वांनी जी पुस्तकरुपी संपदा भेट दिली ती ग्रंथालयांमध्ये कायमस्वरूपी संग्रहीत राहून त्याचा उपयोग विद्यार्थी, तरुण मित्र, ज्येष्ठ मार्गदर्शक व पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना या ज्ञानसंपदेचा उपयोग होणार आहे. 

यावेळी शिवजन्मभुमी युवा फाउंडेशनच्या वतीने शेरकर यांची ग्रंथतुला करण्यात आली तसेच शेरकर मित्र परिवाराच्या वतीने सत्यशीलदादा शेरकर युवा मंचाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होता. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शेरकर यांना पुस्तक रूपाने शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Marathi news pune news books