मांजामुळे चिमुकल्याच्या डोळ्याला गंभीर इजा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

हमजा खान (वय 2 वर्ष रा. तापकीर मळा, काळेवाडी) असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर काळेवाडी फाटा येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे त्याचा डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड : नातेवाईकांसोबत दुचाकीवर बसून घरी निघालेल्या लहान मुलाच्या डोळ्यात रस्त्यावर काटलेल्या पतंगाचा लटकत असणारा मांजा घुसल्याने डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथे घडली.

हमजा खान (वय 2 वर्ष रा. तापकीर मळा, काळेवाडी) असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर काळेवाडी फाटा येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे त्याचा डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

हमीद खान हा त्याच्या नातवाईकासोबत दुचाकीवर बसून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. दुचाकीवर तो पुढच्या बाजूला बसला होता. दरम्यान काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथील रस्त्यावरून जात असताना अचानक काटलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये घुसला. दुचाकीचा वेग कमी असला तरी अचानक झालेल्या या घटनेने तो गाडीवरून खाली कोसळला. मांजा थेट डोळ्यात घुसल्याने डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ पिंपळे सौदागर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला काळेवाडी फाटा येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

पतंगाचा मांजामुळे यापूर्वी अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या मांजामुळे प्राणी पक्षी यांनाही इजा पोहोचते. त्यामुळे पतंगाच्या मांजावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Marathi news Pune news boy injured

टॅग्स