पुणे - चिखलीत दोन वाहनांची टोळक्‍याकडून तोडफोड

संदीप घिसे 
शनिवार, 3 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : रस्त्ययाने ये-जा करणाऱ्यांना एक टोळके विनाकारण शिवीगाळ करीत होते. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणास व आणखी एकास टोळक्‍याने कोयता व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. तसेच दोन वाहनांचीही तोडफोड केली. ही घटना चिखली येथे शुक्रवारी (ता.2) सायंकाळी घडली. 

विक्‍की कावळे, संतोष कळमकर, सचिन तेली (सर्व रा. विद्यानगर, पिंपरी) व तीन अनोळखी व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. समाधान नवनाथ खरात (वय 27, रा. हरगुडेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरगुडे वस्ती येथील रमणा गॅरेजजवळ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक टोळके येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्‍तींना विनाकारण शिवीगाळ करीत होते. याबाबत समाधान खरात यांनी जाब विचारला असता चिडलेल्या टोळक्‍याने समाधान यांना कोयत्याने मारहाण केली. तसेच समाधान यांचे मित्र स्वप्नील गाजरे हाताने व लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले.

समाधान व स्वप्नील यांच्या मोटारीची तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पोलिसांनी दंगल करणे, मारहाण करणे आणि बेकायदा शस्त्राचा वापर करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक भोये याबाबत अधिक तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये टोळ्यांकडून वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू असून ते अद्यापही थांबले नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Web Title: Marathi news pune news breaks two wheeler by anonymous