मांजरीतील उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

सरपंच शिवराज घुले म्हणाले,"विरोधकांना पराभव सहन न झाल्यने त्यांच्याकडून नको ते आरोप होऊ लागले आहेत. परंतु त्याकडे लक्ष न देता गावच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. नागरिकांना अधिकाधिक समाधानी ठेवण्यासाठी आपण विकासाकडे लक्ष देवून काम करणार आहोत.''

मांजरी : गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या उभारणीमुळे मांजरी गावच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यासाठी हे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ग्रामपंचायतने पाठपुरावा करावा, असा सल्ला कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के यांनी दिला.

येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाला आज टिकाव मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. त्याचे भूमिपूजन म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

सरपंच शिवराज घुले, पालिकेतील स्थायी समिती सदस्या रंजना टिळेकर, अँड. शैलेश म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पुरूषोत्तम धारवडकर, संजय धारवाडकर, उज्वला टिळेकर, अमित घुले, सुमित घुले, प्रमोद कोद्रे, सुनिता घुले, निर्मला  म्हस्के, समीर घुले, सीमा  घुले, सुवर्णा विजय कामठे, नयना बहिरट आदी यावेळी उपस्थित होते. 

सरपंच शिवराज घुले म्हणाले,"विरोधकांना पराभव सहन न झाल्यने त्यांच्याकडून नको ते आरोप होऊ लागले आहेत. परंतु त्याकडे लक्ष न देता गावच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. नागरिकांना अधिकाधिक समाधानी ठेवण्यासाठी आपण विकासाकडे लक्ष देवून काम करणार आहोत.''

या उड्डाणपूलाची लांबी ७४९ फुट असून रूंदी १७ मीटर आहे. चौपदरी असा पुल असणार आहे.  सुमारे ५० कोटी रुपये निधीतून पुलाचे काम होत आहे. या कामासाठी १८ महीन्याची मुदत आहे . 

म्हस्के म्हणाले, "मांजरी गावच्या नागरिकांनी पुर्ण बहुमत देऊन जो विश्वास टाकला आहे. त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे विकासाच्या कामामध्ये कुठलेही राजकारण आणणार नाही. गावाच्या विकासाचे काम केले जाईल. आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून मांजरी रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागत आहे. यापुढील काळात मांजरीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते नारळ फोडून उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

Web Title: Marathi news Pune news bridge in Manjri