बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या साठ वाहनांवर कारवाई

संदिप जगदाळे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

हडपसर : बीआरटी मार्गीकेत घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहनांवर धडक कारवाई मोहिमेत हडपसर ते फातीमानगर या अंतरात साठ वाहनांसह महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

हडपसर : बीआरटी मार्गीकेत घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहनांवर धडक कारवाई मोहिमेत हडपसर ते फातीमानगर या अंतरात साठ वाहनांसह महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

बीआरटी मार्गात घुसखोरी करणारी खासगी वाहने जप्त करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नगर रस्ता व वाकड बीआरटी मार्गात 57 वाहनांवर कारवाई पाठोपाठ हडपसर परिसरात 60 वाहनांवर गुरूवारी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. हडपसर ते फातिमानगर मधील सोपानबाग चौकादरम्यान बीआरटी मार्गातील स्कूलबस, रिक्षा, मोटारी, दुचाकी, कार अशा साठ वाहनांवर प्रत्येकी बाराशे रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

वानवडी वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जानमहंम्मद पठाण यांचे पथक आणि पीएमपीचे सुरक्षा विभागातील निरिक्षक संतोष घाडगे व सुरक्षारक्षक कथलकर, पांगारे, शिंदे यांनी ही धडक कारवाई केली.

Web Title: Marathi news pune news brt path action on others