पुणे: पत्नी, दोन मुलींना मारून व्यावसायिकाची आत्महत्या

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

शिवणे पोकळे नगर मध्ये त्याने फ्लॅट विकत घेऊन पत्नी व मुलींसमवेत राहत होता. त्याची मोठी मुलगी पाचवीत तर छोटी मुलगी दुसरीत शिकत होती. त्याची पत्नी नीलम या कोपरे गावात जाऊन मुलांची शिकवणी घेत होत्या. शुक्रवारी रात्री आठ वाजले तरी घरातील लाईट का लावली नाही.

पुणे : व्यवसायातील अपयशामुळे उद्योजक नीलेश सुरेश चौधरी (वय 39, रा. पोकळे नगर) याने नैराश्यातून पत्नी व दोन लहान मुलींना विष देऊन मारले तर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. अशी प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. 

शुक्रवारी रात्री उघडकीस आली. हा उद्योजक शिवणे येथे सदनिकां घेऊन राहत होता.  तो मूळचा शेजारील कोपरे गावचा होता. त्याचे आई वडील तेथे राहत होते. 

शुक्रवारी रात्री त्याने पत्नी नीलम(वय 34), मुलगी श्रावणी(10), व श्रेया(7)यांना त्याने जेवणातून विष देऊन मारले तर त्याने हॉलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
नीलेश हा कमी बोलणारा होता. त्यामुळे त्याच्यावर कर्ज होते का, त्याला कोणता तणाव होता याबाबत अधिक माहिती कोणाला फारशी नव्हती. त्याचा नांदेड येथे प्लॅस्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता. त्यासाठी त्याने कर्ज घेतले होते. शिवणे पोकळे नगर मध्ये त्याने फ्लॅट विकत घेऊन पत्नी व मुलींसमवेत राहत होता. त्याची मोठी मुलगी पाचवीत तर छोटी मुलगी दुसरीत शिकत होती. त्याची पत्नी नीलम या कोपरे गावात जाऊन मुलांची शिकवणी घेत होत्या. शुक्रवारी रात्री आठ वाजले तरी घरातील लाईट का लावली नाही. घरात अंधार असल्याने शेजारील नागरिकांनी डोकावले असता निलेशचा मृतदेह लटकलेला दिसला. ही बाब उघडकीस आली. त्या तिघींचे मृतदेह बेडरूम मध्ये होते. याबाबत उत्तमनगर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news Pune news builder Nilesh Choudhary suicide