महिलांसाठी 22 दिवस कर्करोग तपासणी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

पुणे : कर्करोगासारख्या आजाराचे वेळेत निदान झाले तर उपचार करणे सोपे होते, या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त पुणे शहरातील सर्व प्रभागांमध्ये महिलांसाठी आजपासून 25 मार्चपर्यंत मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.

महापालिकेच्या शाळेतील 25 हजार मुलींची हिमोग्लोबिन तपासणी केल्यानंतर आता हा 20 हजार महिलांच्या कर्करोग तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे. महिलांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. 

महापालिकेच्या वतीने डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपमार्फत हा उपक्रम हाती घेतला आहे, त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी महापौर बोलत होत्या. या प्रसंगी नगरसेवक हेमंत रासणे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, डॉ. अंजली साबणे, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

डॉ. कुलकर्णी यांनी या प्रकल्पाबद्दल महापौरांचे अभिनंदन केले; तसेच कॅन्सरविषयीची माहिती दिली. हा प्रकल्प मिळण्यासाठी अमनोरा येस फाउंडेशनची मदत झाली. सलग 22 दिवस तपासणी शिबिरांचे आयोजन करून महिलांची कॅन्सर तपासणी करणारे पुणे हे एकमेव शहर असेल, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

प्रास्ताविक डॉ. साबणे यांनी केले. डॉ. आंधळे यांनी आभार मानले. कोथरूड येथील सुतार दवाखान्यामध्ये रविवारी सकाळी 9 ते 5 या वेळेत कोथरूडमधील महिलांसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.

Web Title: marathi news pune news Cancer treatment