स्वतःची कार नको रे बाबा... 

स्वतःची कार नको रे बाबा... 

पुणे : केवळ अडीच मिनिटांची प्रतीक्षा आणि जास्तीत जास्त फक्त शंभर मीटर चालत जावे लागेल अशा पद्धतीने जर शहरांतर्गत प्रवासी वाहतूक यंत्रणा विकसित झाली तर? होय, असा अभ्यास न्यूयॉर्क शहरात सुरू आहे आणि त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. या अभ्यासानुसार त्या यंत्रणेमध्ये संपूर्ण शहरासाठी फक्त तीन हजार कॅब पुरणार आहेत. अशाच प्रकारचे 'शेअर इकॉनॉमी' मॉडेल केवळ प्रवासी वाहतुकीमध्येच नाही, तर व्यावसायिक मालवाहतुकीसाठीही वापरण्यात येईल असा ट्रेंड दिसत आहे. 

चीन, अमेरिका, जपान अशा विविध देशांमध्ये स्वतःची आणि नवीन कार विकत घेण्याच्या प्रमाणात घट होत आहे. या देशांमध्ये जारी करण्यात येणाऱ्या वाहन परवान्यांच्या संख्येतही गेली काही वर्षे घट होत आहे. विशेषतः 'मिलेनियल्स' म्हणजे नुकतेच अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या मुला-मुलींचा स्वतःची कार घेण्याऐवजी 'शेअर कॅब' सेवा वापरण्याकडे कल आहे. एका सर्वेक्षणानुसार चीनमध्ये यंदाच्या वर्षी एकतृतीयांश इंटरनेट युजर हे 'राइड- शेअरिंग' सेवा वापरणार आहेत. हेच प्रमाण पुढील वर्षी 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याचे संकेत आहेत. भारतातही उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गामध्ये असाच ट्रेंड दिसू लागला आहे. स्वतःची मोटार विकत घेणे, तिच्या देखभाल- दुरुस्तीवर खर्च करणे आणि चालकाचा पगार हा सर्व खर्च टाळून 'शेअर कॅब' वापरणे सोयीचे असल्यामुळे हा बदल दिसत आहे. 

राईड- शेअरिंगच्या व्यवसायात असलेल्या कंपन्यांनी विकत घेतलेल्या मोटारींच्या संख्येतूनही हा बदल अधोरेखित होतो. गेल्या तीन वर्षांत हा आकडा दुपटीच्या घरात चालला आहे. मोबोलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या 'इंटेलिमेंट टेक्‍नॉलॉजी'चे संस्थापक प्रशांत पानसरे म्हणाले, ''जगभरामध्ये नॉलेज इकोनॉमीकडून 'एक्‍सपिरियन्स इकॉनॉमी'कडे वाटचाल सुरू आहे. ओला, उबेर अशा कंपन्या या ग्राहकांना चांगला 'एक्‍सपिरियन्स' देण्यावर भर देणाऱ्या आहेत. म्हणूनच एखादी कार ही त्या कंपनीच्या मालकीची आहे किंवा नाही याचा विचार न करता ग्राहक सेवेच्या अनुभवाला महत्त्व देत आहेत. केवळ एखाद्या मोबाईल ऍपवरून आपल्याला पाहिजे ते उत्पादन वापरायला मिळणे आणि त्यातून चांगला अनुभव घेणे याकडे पुढील काळातही ग्राहकांचा कल असेल.'' 

वर्ष प्रवासी वाहतुकीच्या कॅब विक्री कॅब ऍग्रीगेटर्सने विकत घेतलेल्या कारची संख्या
2017 3085302 125000
2016 2966637 100756
2015 2772745 70000
  • भारतीय प्रवासी वाहतूक बाजारपेठ - 4800 कोटी डॉलर (2020 पर्यंत) 
  • शेअरिंग इकॉनॉमी बाजारपेठ - 33500 कोटी डॉलर (2025 पर्यंत अपेक्षित) 
  • इंटरनेट युजर्सपैकी छोट्या शहरातील युजर - 80 टक्के 
  • मोबाईलवरून इंटरनेट वापरणारे - 73 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com