दहशत माजविण्यासाठी वाहने फोडली

संदिप जगदाळे
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

हडपसर - हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर येथे आठ जणांच्या टोळीने परिसरात दहशत माजविण्याच्या हेतूने पार्कींग केलेल्या सहा वाहनांची तोडफोड केली व अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. दहशत माजविल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 

कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या दृष्टीकोनातून बुधवारी सायंकाळपासून याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे. अन्य पाच फरारी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी पोलिसांनी इम्राण इपशाद जमादार (वय २८, रा. इंदीरानगर), शरद रावसाहेब आहिरे (वय ३०, रा. बाणेर), फिरोज दिलावर पठाण (वय ३०, रा. लोणीकाळभोर) या तिघांना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी राज शेख व त्याचे चार साथीदार फरार आहेत. यातील काही आरोपी रेकॅार्डवरील गुन्हेगार आहेत. तोडफोड झालेल्या वाहनांमध्ये तीन स्कूल बस, एक मारूती व इंडिका कार आणि एक रिक्षाचा समावेश आहे. ही वाहने हांडेवाडी रस्त्यावरील एका मोकळ्या जागेत पार्कींग केली होती, अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मिलिंद गायकवाड यांनी दिली. 

Web Title: Marathi News Pune News case against eight persons for their acts of terror