पुणे: बावधन परिसरात 20 मिनिटात दोन साखळी चोऱ्या

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 13 जानेवारी 2018

200 मीटरवर पोलिस नाकाबंदी
चांदनी चौक ते पाषाण रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपासमोर हिंजवडी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. पहिली घटना घडली तेथून पोलिसांची नाकाबंदी सुमारे 200 मीटरवर सुरू होती. या दोन्ही घटना संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटे ते साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी बावधन परिसरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.  या परिसरात आम्ही त्या दुचाकींचा शोध घेतला. परंतु सापडले नाही. या परिसरातील सिसिटीव्हीचे फुटेज आधार घेऊन पुढील तपास करणार आहे. असे पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. 

पुणे : बावधन खुर्द परिसरात शुक्रवारी संध्याकाळी अवघ्या 20 मिनिटात दोन साखळी चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या. दोन्ही घटनेत सुमारे दोनशे मीटर अंतर आहे. तर याच परिसरात हिंजवडी पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. दोन्ही घटनेत मिळून तीन तोळे दागिन्यांची चोरी झाली आहे. 

मुख्य रस्त्यावर असलेल्या मराठा मंदिरमागे, हिलसाईड गंगोत्री बिल्डींग समोर ही पहिली घटना घडली. माधवी भगवान कुलकर्णी  या रस्त्याने जात होत्या. यावेळी यांचे गळ्यातील मंगळसूत्र ओढले. काळ्या रंगाच्या पल्सरवरून ते आले होते. गाडी चालविणाऱ्याने हेल्मेट आणि मागच्याने तोंडाला रुमाल बांधला होता. चोरट्यानी थेट कुलकर्णी यांच्या गळ्यात हात टाकून ही चोरी केली. आणि त्या ओरडल्या. याठिकाणी पुणे बाजार समितीचे प्रशासकीय संचालक गोरख दगडे येथे राहतात. कुलकर्णी यांच्या आवाज ऐकून ते बाहेर आले. त्यांनी तातडीने हिंजवडीचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांना फोन केला. ही घटना घडली असल्यामुळे या परिसरात लोकांनी सावध रहावे म्हणून त्यांनी व्हाट्सउप वरून मेसेज केला. 

त्यानंतर, काही मिनिटात दुसरी घटना मुख्य रस्त्यावर एलएमडी चौकात घडली. तेथे गोळे नावाच्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविली. मराठा मंदिर कार्यालयापासून पश्चिम बाह्यवळण महामार्गला जोडणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. 

200 मीटरवर पोलिस नाकाबंदी
चांदनी चौक ते पाषाण रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपासमोर हिंजवडी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. पहिली घटना घडली तेथून पोलिसांची नाकाबंदी सुमारे 200 मीटरवर सुरू होती. या दोन्ही घटना संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटे ते साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी बावधन परिसरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.  या परिसरात आम्ही त्या दुचाकींचा शोध घेतला. परंतु सापडले नाही. या परिसरातील सिसिटीव्हीचे फुटेज आधार घेऊन पुढील तपास करणार आहे. असे पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. 

Web Title: Marathi news Pune news chain snatching in bavdhan