चांदनी चौक भूसंपादनबाबत पुणे आयुक्तांचे आदेश

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे (वारजे माळवाडी) - "चांदनी चौकातील भुसंपादनाबाबत तांत्रिक अडचणी असतील तर थेट माझ्याशी बोला. दररोज मिळकत धारकांशी संपर्कात रहा. सर्व संपादन प्रक्रिया सहा मार्च पूर्वी पूर्ण करा." असे आयुक्त कुणाल कुमार यांचे पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पुणे (वारजे माळवाडी) - "चांदनी चौकातील भुसंपादनाबाबत तांत्रिक अडचणी असतील तर थेट माझ्याशी बोला. दररोज मिळकत धारकांशी संपर्कात रहा. सर्व संपादन प्रक्रिया सहा मार्च पूर्वी पूर्ण करा." असे आयुक्त कुणाल कुमार यांचे पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आमदार भीमराव तापकीर यांनी चांदणी चौक उड्डाणपूल प्रश्नी बाधित जमीनदार, मिळकतदार व त्यांचे प्रतिनिधी यांचे मागणीनुसार आयुक्तांसमवेत ही बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात ही बैठक पार पडली. याप्रसंगी बाधित जमीन मिळकतदार, महापालिका भूसंपादन अधिकारी सतीश कुलकर्णी, प्रभाग समिती अध्यक्ष  दिलीप वेडे- पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक किरण दगडे, महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व बाधित जमीनदार, मिळकतदार पालिकेला जागा देण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने जागा ताब्यात घेण्यात  काही अडचणी नाहीत. असे असून यापूर्वी घेतलेल्या बैठकीत चर्चा जास्त झाली.  भूसंपादन कमी झाले. यामुळे, सर्व अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करावी. त्यामुळे, भूसंपादन कमी वेळेत पूर्ण होऊन परिणामी पुलाचे प्रत्यक्ष कामास वेग येईल. सर्व मिळकत दारांना नियमानुसार ठरलेला बाजूने त्यांना मोबदला द्यावा. तसेच पैकी छोट्या एक दीड गुंठ्यापेक्षा कमी जागा असणाऱ्या मिळकतदारांना शक्य झाल्यास रोख रक्कम स्वरूपात मोबदला देण्याची मागणी आमदार तापकीर यांनी केली. 

कोणाला डावलणार नाही- आयुक्त
हा प्रकल्प पूर्ण करताना सर्व मिळकतदारांना व जमीनदारांना डावलून हे काम करणार नाही. किंवा हुकूमशहा पध्दतीने काम करणार नाही. प्रत्येक व्यक्तीला मोबदला दिला जाणार आहे. असा । आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकतदारांना दिला. तर अधिकाऱ्यांनी दररोज 24 तास काम करून तुमच्या पातळीवर विषय मार्गी लावावेत संपादन पूर्ण करावे. अधिकाऱ्यांना तांत्रिक बाबी अडचणी असल्यास मी देखील आपणास सतत उपलब्ध आहे.

Web Title: marathi news pune news chandani chauk road construction commisioner