तीन छत्रपतींचा इतिहास तरुणांना प्रेरणादायी: पांडुरंग बलकवडे

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 11 मार्च 2018

"भाजप शिवसेनेच्या सरकारचा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये देखील गड किल्ले संवर्धन करण्यासाठी निधी दिला आहे. सिंहगड विकासासाठी गडावरील ऐतिहासिक बांधकाम, समाधी परिसर सुशोभीकरण रस्ते, दरडी पासून संरक्षण यासाठी पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत." असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले. 

खडकवासला  : "छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्य कारभार करण्यास सुरुवात केली. तसेच छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम महाराज यांना देखील तारुण्यात स्वराज्याचा कारभार हाती घ्यावा लागला. त्या तिघांचा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे." असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केलं.

छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर फाल्गुन वद्य नवमीला निधन झाले.त्यांच्या 318व्या पुण्यतिथी निमित्त आज शनिवारी सिंहगडावर अभिवादन सभा झाली. हवेली पंचायत समिती, घेरा सिंहगड ग्रामपंचायत व हरजी ढमढेरे परिवाराच्या वतीने याचे आयोजन केले होते. त्यावेळी बलकवडे बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध यादव, सरपंच रेखा खाटपे, उपसरपंच किसन पढेर, छत्रपती राजाराम महाराज समितीचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, सिंहगडचे इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक, शिवजयंती समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, विस्तार अधिकारी एन.डी.कारंडे, सिंहगडचे सदस्य व माजी सरपंच पांडुरंग सुपेकर, अमोल पढेर, सीमा पढेर, सरपंच सचिन पासलकर उपस्थित होते. सिंहगड पावित्र्य मोहिम शिवेसना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या अभिवादन केले. 

बलकवडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यानंतर आलेल्या संकटकाळात स्वराज्य सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 19 वर्षे होते. त्यांनी सात वर्षे राज्य केले. जिंजीच्या किल्ल्यावर कारभार पाहिला. तर छत्रपती संभाजी देखील लहान वयापासून शिवरायांचा कारभार जवळून पहिला, आणि काही जबाबदाऱ्या देखिल होत्या. आग्र्याहून सुटकेच्यावेळी ते लहान होत्र तर वयाच्या 24 व्या वर्षी शिवरायांच्या निधनानंतर सर्व स्वराज्याची जबाबदारी स्वीकारावी लागली."

स्वराज्यात सहभागी असलेल्या असलेल्या प्रत्येक घराण्याने  आपला इतिहास लिहण्यासाठी सिद्ध व्हावे. दुसऱ्या कोणीतरी येऊन आमचा इतिहास लिहावा. हा विचार सोडावा. असे देखील बलकवडे यांनी सांगितले. 

"भाजप शिवसेनेच्या सरकारचा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये देखील गड किल्ले संवर्धन करण्यासाठी निधी दिला आहे. सिंहगड विकासासाठी गडावरील ऐतिहासिक बांधकाम, समाधी परिसर सुशोभीकरण रस्ते, दरडी पासून संरक्षण यासाठी पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत." असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news Pune news Chatrapati Rajaram Maharaj