चिखलीच्या सरपंचपदी सुवर्णा भंडलकर व उपसरपंचपदी शोभा गायकवाड

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 9 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : चिखली (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा अंकुश भंडलकर व उपसरपंच पदी शोभा मोहन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

येथील तत्कालीन सरपंच केशर हरीश्‍चंद्र बंडगर व उपसरपंच तायाप्पा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद व उपसरपंचपदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. पारधी व तलाठी शिवाजी खोसे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सुवर्णा भंडलकर यांचा सरपंचपदासाठी व शोभा गायकवाड यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोघींची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले.

यावेळी माजी सरपंच केशर बंडगर,माजी उपसरपंच तायाप्पा पवार, ग्रामपंचायत सदस्य नंदा कवळे , पोलीस पाटील राजीव गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र निकम , ग्रामसेवक एस. आर. लोणकर उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news chikhali sarpanch upsarpanch