नाताळनिमित्त चर्चमध्ये बाल मेळाव्यांचे आयोजन 

नाताळनिमित्त चर्चमध्ये बाल मेळाव्यांचे आयोजन 

पुणे : नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि बाल मेळावेही आयोजित केले होते. या निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमही घेण्यात आले. धार्मिक विधीनंतर चर्चमधील धर्मगुरूंचे बालकांनी आशीर्वाद घेतले. 

प्रभुयेशूच्या जन्मानंतर आकाशात एक तारा दिसला. यावरून यहुद्यांचा राजा जन्माला आला, अशी बातमी राजा हेरोदाला मिळाली. परंतु आपल्यानंतर आपल्या मुलाने राज्य करावे, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने निर्दोष बालकांना ठार मारण्याचा हुकूम दिला. राज्याच्या हुकुमानंतर हजारो बालके ठार मारण्यात आली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 डिसेंबरला ख्रिश्‍चन धर्मीयांतर्फे निर्दोष बालक दिन पाळण्यात येतो, अशी माहिती चर्च ऑफ द होलीनेम कॅथेड्रलचे (सीएनएन) सहसचिव सुधीर चांदेकर यांनी दिली. 

ओल्ड हॅम मेथडीस्ट चर्च येथे लहान मुलांनी ख्रिस्त जन्माविषयीची नाटिका सादर केली. रेव्हरंड चंद्रशेखर जाधव, प्रमोद फ्रेजर, मार्कस देशमुख, शामसन ऍन्ड्रुज यांनी लहानग्यांना शुभेच्छा दिल्या. सेंट मॅथ्युज चर्च येथे लहान मुलांसाठी विविध गुणदर्शन आणि खेळ यासंबंधीच्या स्पर्धा भरवली होती. रेव्हरंड अनिल पातारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले, अशी माहिती चर्च समितीचे सदस्य सुरेश राठोड यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com