अठरा वर्षानंतरही अनाथच, सांगा कसं जगायचं?

prison
prison

पुणे : बाल गृहातून 18 वर्षणातर बाहेर पडावे लागणाऱ्या अनेक अनाथ मूलांची त्यांना 'माणूस' म्हणूनही ओळख मिळत नाही. अनाथ मुलांची देखभाल करण्यासाठी सरकारने बालगृहे तयार केली आहेत. परंतु, हेच मूल जेव्हा अठरा वर्षांचे होते, तेव्हा मात्र ते खऱ्या अर्थाने निराधार होते. त्याला सरकारकडून कोणत्याही आवश्यक कागदाचाही कसलाही आधार मिळत नाही. अठरा वर्षांचे झाल्यानंतर त्या अनाथ मुलाने जायचे कुठे ? जगायचे कसे ? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. त्यामुळे या मुलांसाठी पहिल्यांदाच राज्यभरातून विविध व्यक्ती व संस्था एकत्र येउन एक राज्यस्तरीय बैठीक येत्या 10 जानेवारीत आमदार निवास येथे आयोजित होत आहे. 

या मुलांना सहानुभूती नव्हे, तर त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी  विविध महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील  अनाथाश्रमातील  अनाथ म्हणून वाढलेले माजी प्रवेशित आपल्या हक्कांसाठी प्रथमच संघटीत होत आहेत. व ते अनाथ मुलांच्या विविध प्रश्नांवर लढणार आहेत. 

बालगृहांमध्ये अनाथ मुल अठरा वर्षे जगते, तिथे राहते. परंतु, त्यांना बाहेरच्या जगाची पुरेसी ओळख झालेली नसताना  देखील कसलाही आधार न देता त्याला अठरा वर्षानंतर मूल सज्ञान झाले समजून शासनाच्या नियमानुसार संस्थेतून बाहेर पडावे लागते. परंतु, ही अनाथ मुले बाहेरील जगाबाबत अठरा वर्षानंतरही अज्ञानच असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने विविध योजना लागू कराव्यात, त्यांना समाजात ओळख मिळावी. त्यांना  त्यांची समाजात ओळख असावी यासाठी शासन उपयुक्त आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड मिळावे, यासाठी ठोस पावले उचलावीत. त्यांच्यासाठी विविध योजना लागू कराव्यात म्हणून राज्यभरातून अनाथ मुलांसाठी काम करणा-या संस्था व व्यक्ती एकत्र येत आहेत. काही अनाथ मुलांनी स्वत:च्या हिमतीवर नावलौकिक मिळवला आहे. अशी मुले देखील यामध्ये सहभागी झाली आहेत.

नाव उसणं घेऊन जगावं लागतं...
निराधार मूल अठरा वर्षानंतर या समाजात सज्ञान म्हणून गणले जाते. परंतु, या मुलाला पुढे काय करायचे हेच माहित नसते. त्याच्याकडे कसलीही ओळख नसल्याने तो इतरत्र भटकत राहतो. यामध्ये मुलांपेक्षा मुलींची अवस्था वाईट होते. त्यांना कुठेच आधार मिळाला नाही, तर वेश्यव्यवायाकडे वळावे लागते. किंबहुना त्यांचा नाईलाज होतो. अनेकजण हॉटेलमध्ये काम करतात, कोणाच्या घरी घरगडी म्हणून राहतात, दुकानात काम करतात. स्वत:चे हक्काचे नाव नसल्यामुळे त्यांना कोणाचे तरी उसणं नाव घेऊन जगावं लागतं, असे निराधार मुलांसाठी एकत्र आलेल्या गटाच्या राज्य समन्वयक आणि सनाथ वेलफेअर असोसिशन च्या संचालिका गायत्री पाठक यांनी ही माहिती दिली 

बुधवारी मुंबईत बैठक 
याबाबत १० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता नवीन मनोरा, आमदार निवास, नरीमन पॉँईट, विधानभवनाच्या मागे, चर्चगेट, मुंबई  येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये निराधार व त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था सहभागी होणार आहेत, अशी माहिती या बैठकीचे नेतृत्व करणारे अभय तेली यांनी ही माहिती दिली. 

 महत्त्वाचे मुद्दे 
* दैनंदिन कामासाठी सरकारकडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे मिळावीत
* शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण द्यावे 
* शासकीय वसतीगृह, खासगी वसतीगृहांमध्ये राखीव जागा हव्यात. 
* अपघात झाल्यानंतर सरकारने उपचाराचा खर्च उचलावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com