डोळ्यात मिरचीपूड टाकून सोनसाखळी पळवली 

संदीप घिसे 
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने डोळ्यात मिरचीपूड टाकून सुमारे अडीच लाख रुपयांची सोनसाखळी पळवली. ही घटना पिंपरीतील युनायटेड एजन्सीच्या जवळ बुधवारी (ता. २८) सकाळी घडली. अनिल हिरामन नवघणे (वय ४० रा. इंद्रायणीनगर, वडगाव मावळ) यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठ वर्षांच्या सुमारास नवगणे हे पिंपरीतून चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नवगणे यांना थांबवले. डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या गळ्यातील दोन लाख ५० हजार ९४० रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी करीत आहेत

Web Title: Marathi news pune news chili powder in eyes golden chain stolen