ज्ञानसागर गुरुकुलमध्ये 'स्वच्छ घर स्वच्छ देश' उपक्रम

संतोष आटोळे
शनिवार, 13 जानेवारी 2018

शिर्सुफळ : सावळ (ता.बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये स्वच्छता अभियानाच्या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी स्वच्छ घर स्वच्छ देश या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेसह घराच्या परिसरातील कचरा संकलित करुन स्वच्छतेचा संदेश दिला.

देशासह राज्यात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या ज्ञानसागर गुरुकुलनेही या अभियानाच्या जागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार शाळेमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले व यातूनच विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेतून स्वतःच्या घरातील व आजूबाजूच्या परिसरातील जितका जास्तीत जास्त शक्य तितका प्लास्टिकचा कचरा गोळा केला व तो शाळेत जमा केला. विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम, रोग, येणारी संकटे, उद्भवणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींची वारंवार जाणीव करुन देण्यात येत असते. यातूनच मिळालेल्या प्ररणेतून विद्यार्थ्यांच्याच पुढाकारातून स्वच्छ घर स्वच्छ देश हा उपक्रम आयोजित केला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवळ जवळपास पन्नासहुन अधिक गोण्या प्लास्टिक कचरा गोळा करुन संकलित केला. या उपक्रमाचे कौतुक सर्व पालक वर्ग तसेच परिसरातून करण्यात आले.

Web Title: Marathi news pune news clean home clean country activity by dnyansagar gurukul