कंपन्यांनी संशोधन संस्थांचे सहकार्य घ्यावे - अमित कल्याणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - ‘‘कुशल मनुष्यबळ, नावीन्यपूर्ण संकल्पना व उत्पादन प्रक्रियेसाठी पाश्‍चिमात्य देशांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादन क्षेत्रात भारत प्रगतीच्या टप्प्यावर असेल. कंपन्यांनी देखील नवनिर्मितीच्या दृष्टीने ‘सीओईपी’, ‘एआरएआय’ यासारख्या संस्थांचे सहकार्य घ्यावे,’’ असे मत भारत फोर्जचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी यांनी व्यक्त केले.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट’च्या वतीने (एनआयपीएम) ‘भविष्य काळातील उद्योग क्षेत्रातील बदल’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. एनआयपीएमचे अध्यक्ष विश्‍वेश कुलकर्णी यांच्यासह विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कल्याणी म्हणाले, ‘‘ज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे परदेशी कंपन्यांनी उद्योगक्षेत्रात भरारी घेतली. आपल्याकडील कंपन्यांनी एकमेकांना मदत करायला हवी. त्यासाठी बदलते तंत्रज्ञान स्वीकारून कार्यपद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे. इंडस्ट्री ४.० प्रणाली, ऑटोमेशन, रोबोटिक्‍स, व्हर्च्युअल रिॲलिटीमुळे उद्योगक्षेत्रात मोठे बदल घडू लागले आहेत. तंत्रज्ञानाचा रोजगारावरती मोठा प्रभाव पडत आहे.’’

जर्मनीच्या प्रगतीचे गमक
उद्योग क्षेत्रासमोर चांगले मनुष्यबळ मिळविण्याचे आव्हान असते. तरुणांमध्ये कौशल्यासह काहीतरी करून दाखविण्याची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. कंपन्यांनी देखील कौशल्य प्रशिक्षणाच्या जबाबदारीसाठी पुढाकार घ्यावा. शिक्षण पद्धतीतही बदल घडण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी देऊन त्यांची आवड बघितली पाहिजे. या धोरणामुळे जर्मनीची प्रगती झाली असल्याचे अमित कल्याणी यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news company research organisation amit kalyani