लग्नाची विचारणा करणाऱ्या मुलीस पिता-पुत्राची मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

चिराग काटे व त्याचे वडील सुरेश काटे यांनी मुलीला दमदाटी करून मारहाण केल्याने संबंधित मुलीने मुंग्या मारण्याचे औषध घेतल्याने ती बेशुद्ध पडली. स्थानिकांनी त्या मुलीला वालचंदनगरमधील खासगी दवाखान्यात दाखल केले होते.

वालचंदनगर : लग्नाची विचारणा करण्यासाठी आलेल्या मुलीला दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी चिराग सुरेश काटे आणि सुरेश काटे (रा. रत्नपुरी, ता. इंदापूर) या पिता-पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. 

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग काटे हा 2016 मध्ये बारामतीमधील जळोची येथे राहण्यासाठी गेला होता. त्या वेळी त्याने तेथील एका मुलीस लग्नाची मागणी घातली. ओळखीचा गैरफायदा घेऊन ती घरात एकटी असताना विनयभंग करून तो पळून गेला होता. संबंधित मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी चिराग काटे याला बोलावून घेतले. त्या वेळी त्याने त्या मुलीशी लग्न करण्याचे मान्य केले. त्यानंतर वारंवार लग्नाची विचारणा केल्याने काटे याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे 26 डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास संबंधित मुलगी लग्नाबाबत विचारपूस करण्यासाठी रत्नपुरी येथे आली. 

त्या वेळी चिराग काटे व त्याचे वडील सुरेश काटे यांनी मुलीला दमदाटी करून मारहाण केल्याने संबंधित मुलीने मुंग्या मारण्याचे औषध घेतल्याने ती बेशुद्ध पडली. स्थानिकांनी त्या मुलीला वालचंदनगरमधील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. संबंधित मुलीने वालचंदनगर पोलिस ठाण्यात काटे पिता-पुत्राविरुद्ध फिर्याद दिली आहे. हा गुन्हा बारामती पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 
 

Web Title: marathi news pune news crime news asking marriage girl Hitting by father son