चिंचवड गोळीबार प्रकरणी मामा गँगचे दोन जण ताब्यात

संदीप घिसे 
बुधवार, 21 मार्च 2018

पिंपरी - चिंचवड येथे झालेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार जयवंत चिपळूणकर जखमी झाला होता. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी मामा गँगच्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

मंगळवारी पहाटे वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये सराईत गुन्हेगार जयवंत चिपळूणकर हा गोळीबारात जखमी झाला. तर त्याचा साथीदार नीलेश कोळपे हा मारहाणीमध्ये जखमी झाला. जखमींनी याबाबत फिर्याद देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासामध्ये वेताळनगर चिंचवड येथील मामा गँगशी संबंधित असलेल्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. मोटारीला दगड मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गोळीबाराबाबत अधिक माहिती समोर येईल, असे सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news crime shooting police