पुणे : हडपसरमध्ये चोरीची वाहने जप्त

संदीप जगदाळे
बुधवार, 7 मार्च 2018

वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप देशमाने, पोलिस उपनिरिक्षक मंगेश भांगे, रविंद्र बागुल, नितीन मुंडे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सौदाबा भोजरावस राजेश नवले, युसुफ पठाण यांचा या पथकात समावेश आहे. 

हडपसर : जानेवारी ११ पासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथाकाने ५४ आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक करून ही वाहने जप्त केली आहेत. कमी कालावधीत मोठया प्रमाणात वाहने जप्त करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. अटक आरोपींकडून मोठया प्रमाणात वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

परिमंडळ चार च्या मार्फत ११ जानेवारी पासून वाहन चोरी विरोधी पथक स्थापन करून वाहनचोरांना पकडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. स्वतंत्रपणे हडपसर, मुंढवा, कोंढवा, वानवडी आणि खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयात अशाप्रकारची पथके स्थापन करण्यात आली आहेत. 

बुधवारी बालाजी मनोहर मन्नावत (वय. ३० रा. वाखारी, दौंड), शेखऱ रामचंद्र कुल (वय २०, रा, दौंड), सागर दिलीप जगताप (वय ३६ रा. खोपवाडी, ता. बारामती), सतीश वामन कुल (य ३०, रा, दौंड) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २३ वाहने जप्त केली असून त्यामध्ये एका कारचा समावेश आहे. 

वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप देशमाने, पोलिस उपनिरिक्षक मंगेश भांगे, रविंद्र बागुल, नितीन मुंडे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सौदाबा भोजरावस राजेश नवले, युसुफ पठाण यांचा या पथकात समावेश आहे. 

वाहन चोरीस प्रतिंबध करण्यासाठी त्रिस्तरीय योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये फिक्स पॅाईंट, नाकांबदी, दुचाकी वाहनावरून वाढीव गस्त घालणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सदर पथके पुणे व पुणे शहरा लगतच्या भागात व इतर जिल्हयात रवाना करण्यात आली. या पथकांनी आष्टी, जामखेड, राशीन, कर्जत, पाटस, यवत, कुरकुंभ, दौंड, काष्टी, श्रीगोंदा, चाकण, खेड, सासवड, जेजुरू, लोणंद या भागात गोपनीय माहिती व वाहनचोरी तक्रार अॅप चा सुयोग्य वापर करून तसेच पुणे जिल्हयातील वेगवेगळ्या भागात जावून सलग तीन ते चार दिवस ठाण मांडून चोरीच्या गाडया व त्या गाडया चोरणा-य चोरांवर पाळत ठेवली. 

वाहन चोरी करणारे आरोपी हे सुशिक्षित आहे. शहरात कामानिमित्त आल्यानंतर ते वाहने चोरून नेत. बहुतांस दुचाकी या होंडा कंपनीच्या आहेत. ग्रामिण भागातील कमी उत्पन्न गटातील लोकांना ही वाहने कमी कमितीत विकण्याचे काम हे चोरटे करत. हे सर्व आरोपी नवीन असून त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत. होंडा कंपनीच्या गाडयांचे लॅाक लगेच काढता येते. त्यामुळे वाहने सुरक्षित जागी पार्क करावीत व त्याला स्वतंत्र लॅाक लावावे असे अवाहन हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी केले आहे.

Web Title: Marathi news Pune news crime thief