दौंड नगरपालिकेतील गटनेत्यावर कारवाईची मागणी  

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 6 जानेवारी 2018

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांच्याबद्दल व्हॅाट्सअॅपवर बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांच्याबद्दल व्हॅाट्सअॅपवर बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. नगरसेवक राजेश गायकवाड यांनी एका व्हॅाट्सअॅप ग्रुपवर कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. सदर पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी राजेश गायकवाड यांचा निषेध करून तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे. निवेदन सादर करताना पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नोटरी अजित बलदोटा यांच्यासह बादशहा शेख, इंद्रजित जगदाळे, गुरूमुख नारंग, विलास शितोळे, प्रणोती चलवादी, अनिता दळवी, आदी उपस्थित होते. नगरसेवक राजेश गायकवाड हे दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.

Web Title: Marathi news pune news daund