दौंड शहरात शांततेत कडकडीत बंद

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 2 जानेवारी 2018

दौंड : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत दौंड शहरात या दंगलीच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. दौंड शहरात आज (ता. २) सकाळी रिपाईं (आठवले गट) सह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी व्यापारी आणि दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. दुकानदारांनी दुकाने बंद केली परंतु अचानक दुकाने बंद झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावारण निर्माण झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकार आणि पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

दौंड : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत दौंड शहरात या दंगलीच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. दौंड शहरात आज (ता. २) सकाळी रिपाईं (आठवले गट) सह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी व्यापारी आणि दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. दुकानदारांनी दुकाने बंद केली परंतु अचानक दुकाने बंद झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावारण निर्माण झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकार आणि पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. १ जानेवारी रोजी पोलिसांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर दगडफेक करून अमानुष मारहाण करीत वाहने पेटविण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना ताब्यात न घेता अप्रत्यक्षरित्या मोकळीक दिल्याने दंगल भडकल्याचे निवेदनात नमूद कर्यात सदर घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्यासह पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या बाहेर रिपाईं नेते प्रकाश भालेराव यांच्यासह सतीश थोरात, राज जोगदंड, रोहित कांबळे, शीतल मोरे, आशा मोहिते, आदींनी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर व तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना सादर केले. कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर दौंड शहर व परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही. 

 

Web Title: Marathi news pune news daund peaceful strike