डेक्कन महाविद्यालय परिसरात बांबूची वने जाळली !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

येरवडा - डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व बांबूची वने जाळली जात आहेत. स्थानिक रहिवासी अधर्वट जळालेले बांबू सरपणासाठी, तर काही जण दारू गाळण्याच्या भट्ट्यांसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणार असल्याचे डेक्कन कॉलेजचे (इस्टेट) व्यवस्थापक प्रशांत खेडेकर यांनी सांगितले.

सामाजिक वनीकरणअंतर्गत वन विभागाने दोन दशकांपूर्वी डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. हे वृक्ष आता मोठे झाले असून, बांबूच्या वनांचा विस्तार झाला आहे. मात्र, काही समाजकंटक या बांबूंच्या जाळ्यांना लाग लावत आहेत. त्यानंतर अर्धवट जळालेले बांबू सरपणासाठी घेऊन जात आहेत, तर काही मंडळी तोडलेल्या वृक्षांची लाकडे दारूच्या भट्ट्यांसाठी वापरत आहेत.

या सदंर्भात प्रशांत खेडेकर म्हणाले, 'वृक्षतोड करणारे येथील सुरक्षारक्षकांना जुमानत नाहीत. त्यांची वाहने जप्त केल्यास महिलांचा गट येऊन दमदाटी करतात. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आता मात्र वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे.''

डेक्कन महाविद्यालयाचा शंभर ते सव्वाशे एकरांचा परिसर आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात सुरक्षारक्षक नेमणे कॉलेज प्रशासनाला शक्‍य नाही. त्यामुळे महाविद्यालयाची पूर्वेकडील सीमाभिंत ओलांडून समाजकंटक आवारात प्रवेश करतात व वृक्षतोड करतात.

मद्यपी व प्रेमीयुगुलांचा अड्डा
डेक्कन महाविद्यालयाचे आवार हे रात्रीच्या वेळी मद्यपी व प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे. रविवारी इतर सुट्ट्यांच्या दिवशी चुलीवर स्वयंपाक करून पार्ट्या सुरू असतात. याबाबत पोलिसांना कळवूनही कारवाई होत नाही. तर, आपल्या परिसराचे रक्षण करण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: marathi news pune news deccan college bamboo forest