इंदापूरच्या विकासासाठी 1 कोटी ८९ लाखांचा विकास निधी

राजकुमार थोरात
शनिवार, 13 जानेवारी 2018

वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये रस्ते दुरुस्ती, सभामंडप, कालव्यावरती पूल बांधण्यासाठी एक कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये रस्ते दुरुस्ती, सभामंडप, कालव्यावरती पूल बांधण्यासाठी एक कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

 पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये १० रस्त्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी एक कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये मरडवाडी ते रुई रस्ता ५ लाख रुपये, जगदाळेवस्ती ते माळवाडी ररस्त्यासाठी ३ लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ते सातपुतेवस्ती रस्ता २० लाख रुपये, माळवाडी नंबर-१ ते वलेकरवस्ती रस्ता २० लाख रुपये, कळाशी ते अगोती नंबर-३ रस्ता ५ लाख रुपये, इंदापूर-माळवाडी ते शिंगाडेवस्तीरस्ता ५  लाख रुपये, रुई ते विठ्ठलवाडी रस्ता १९ लाख, अंथुर्णे ते धायतोंडीवस्ती १५ लाख रुपये, भरणेवाडी-धायतोंडेवस्ती ते उंबरवाडीरस्ता १५ लाख रुपये, भरणेवाडी ते बिरोबामंदीर रस्ता १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. 

तसेच तालुक्यातील मंदीरांच्या सभामंडप, संरक्षण भिंत, कालव्यावरती पूल बांधण्यासाठी ६६ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये रुई गावातील पिंपळाचा मळा येथे लक्ष्मीमाता मंदीराचा सभामंडप बांधण्यासाठी ५ लाख, तळेवस्ती येथे हनुमान मंदिर सभामंडपासाठी ५ लाख रुपये, माने लावंडवस्ती गणेश मंदिराच्या सुशोभिकरणासाठी ५ लाख रुपये, थोरातवाडी मधील मारुती मंदिरासाठी, सभामंडपासाठी ३ लाख ७० हजार रुपये, पशुवैद्यकीय दवाखाना व विठ्ठल मंदिराच्या परीसरामध्ये प्लेविनब्लॉक बसवण्यासाठी ४ लाख रुपये, मराडवाडी येथील नाथ मंदीराचा सभामंडप बांधण्यासाठी ५ लाख रुपये, श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील मंदिरासाठी संरक्षक भिंतीसाठी ५ लाख रुपये, मंदिराच्या परीसरामध्ये शौचालये बांधण्यासाठी अडीच लाख, व सभामंडपासाठी १० लाख, अगोतीनंबर-२ हनुमान मंदिराजवळील ढकेवस्ती येथे सभामंडपासाठी १२ लाख रुपये, वरकुटे बुद्रुक येथील भैरवनाथ मंदीर स्वयंपाक घरासाठी साडेचार लाख रुपये, गोतोंडी, शेंडेवस्ती कालव्यावरती पूल बांधण्यासाठी ५ लाख रुपये मंजूर झाल्याचे माने यांनी सांगितले. 

 

Web Title: Marathi news pune news development of indapur