पुणे: देवेन शहा खून प्रकरणी एकजण ताब्यात

अनिल सावळे
रविवार, 21 जानेवारी 2018

प्रभात गल्ली क्रमांक सात येथील सायली अपार्टमेंटमधील व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 55) यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. ही घटना शनिवारी (ता. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती.

पुणे : डेक्कन येथील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला.

प्रभात गल्ली क्रमांक सात येथील सायली अपार्टमेंटमधील व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 55) यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. ही घटना शनिवारी (ता. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. हल्लेखोरांनी शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांचा मुलगा अतित शहा (वय 29) यांनी तक्रार दिली. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Web Title: Marathi news Pune news Deven Shah murder case