डिजिटल बॅंकिंगचा वापर करा : ननवरे

राजकुमार थोरात
शनिवार, 20 जानेवारी 2018

वालचंदनगर : ग्रामीण भागातील जास्तीजास्त नागरिकांनी बॅंकाच्या डिजीटल सुविधांचा वापर करण्याचे आवाहन देना बॅंकेच्या वालचंदनगर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक महेशकुमार ननवरे यांनी केले.

लासुर्णे (ता.इंदापूर) येथे देना बॅंक,सुभाष क्षीरसागर सराफ अॅन्ड सन्स व अपोलो इन्सुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व डिजीटल बॅंकींग विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ननवरे यांनी सांगितले की, बदलत्या काळानूसार बॅंकींग क्षेत्रामध्ये अामुलाग्र बदल झाले आहेत.

पूर्वीच्या काळी खात्यामधून पैसे काढण्यासाठी तासन् तास रांगेमध्ये थांबावे लागत होते.मात्र आत्ता डिजीटल बॅंकींगमुळे ए.टी.एम.मशिन द्वारे चोवीस तास नागरिकांना सहज पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.तसेच नागरिकांनी घरी बसून बॅंकेचे आॅनलाईन व्यहवार ही करता येतात. यासाठी केंद्र शासानाने विविध अॅप उपलब्ध करुन दिले असून याचा वापर करावा. तसेच प्रत्येक ग्राहकाने पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे अर्ज बॅंकेमध्ये भरुन घेण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये ६० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.कार्यक्रमास देना बॅंकेचे सहव्यवस्थापक वत्सल बडर्थवाल, सुभाष क्षीरसागर सराफ अॅन्ड सन्स चे संचालक अभिजित क्षीरसागर,व्यवस्थापक सुमित पाखरे,राजू माळवदे उपस्थित होते. 

आधार कार्ड,ओटीपीची माहिती देवू नका : ननवरे
फोनवरुन माहिती विचारुन नागरिकाच्या खात्यातून पैसे काढून घेण्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकांनी फोनवरुन अाधार कार्ड, एटीएम काॅर्डचा क्रंमाक व ओटीपी क्रंमाकाची माहिती कोणालाही देवू नये असे आवाहन ननवरे यांनी केले.

Web Title: marathi news Pune News Digital Banking India