पुणे - सावळच्या ज्ञानसागरला टाॅप स्कूल ऑफ इंडिया पुरस्कार

संतोष आटोळे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

शिर्सुफळ (पुणे) : सावळ (ता.बारामती) ज्ञानसागर गुरुकुलला टाॅप स्कूल ऑफ इंडिया पुरस्कार दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एलिट एज्युकेशन समीट 2018 शिक्षण परिषद दिल्ली येथे पार पडली. या परिषदेमध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, बिहार, पंजाब, ओरिसा, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, दिल्ली, हरियाणा या विविध राज्यातून  विविध शाळेचे संस्थापक, संचालक आणि प्रिन्सिपल आले होते.

संपूर्ण देशातील एकूण 127 शाळेची निवड करून त्यांना टॉप स्कूल ऑफ इंडिया 2017 हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्थेत सतत आमूलाग्र बदल घडवणारी ज्ञानसागर गुरुकुल, सावळ शाळेला टॉप स्कूल ऑफ इंडिया- 2017 या पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्ञानसागर गुरुकुलमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात. 2017-18 या शैक्षणिक वर्षात या शाळेतून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, कराटे, कुस्ती, स्काऊट गाईडमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन ज्ञानसागरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मानव संशोधन मंत्रालय भारत सरकारचे सचिव अनिल स्वराया, एलिट एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी-अधिकारी गुप्ता, मंजुला पूजा, रोशन गांधी  फौरोही, रेहान पिंटो, आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक प्रा. सागर मानसिंग आटोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Web Title: Marathi news pune news dnyansagar top school of india award