लेबल बदलून दारु विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Liquor
Liquor

तळेगाव स्टेशन (पुणे) : लेबल बदलून दमण निर्मित विदेशी मद्याची महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी (ता. 15) रात्री पर्दाफाश करण्यात आला. एकूण बारा लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना राज्य उत्पादनशुल्कच्या पथकाने अटक केली आहे.

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभाग पुणे या कार्यालायाला नाशिक पुणे महामार्गावरून मद्याची अवैध पणे वाहतूक होणार असल्याचे खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव विभाग आणि तळेगाव दाभाडे विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून जुन्नर तालुक्यातील चाळक वाडी येथे सापळा लावण्यात आला होता.

दरम्यान तिकडून जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप क्र.एमएच १४ एफ टी 1466 या वाहनाची तपासणी केली असता, दादरा नगर हवेली विक्रीस मान्यता असलेले विविध ब्रंडचे विदेशी मद्याचे 35 बॉक्स प्लास्टिक क्रेट खाली झाकलेले आढळून आले. वाहन चालक पंकज नारायण भोर (24 ,नगदवाडी,जुन्नर,पुणे) यास पथकाने मालासह जागीच अटक केले. भोर याची कसून चौकशी केली असता, सदरचे मद्य हॉटेल आकाश चाकण तळेगाव रोडवरील येलवाडी (ता.खेड जि.पुणे) विजय फलके नामक व्यक्तीस देणार असल्याचे कळले. त्यानुसार हॉटेल आकाश येथे छापा टाकून विजय हरिभाऊ फलके (वय-३५,अमुंडी,आंबेगाव जि.पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. फलकेने दिलेल्या माहितीवरून, निष्पन्न झाल्याप्रमाणे सदरचे मद्याचे बॉक्स घेण्यासाठी आलेल्या भागूजी किसन पारीठे (३३,इंगळून पारीठेवाडी,मावळ,पुणे) आणि विलास सयाजी  करवंदे (३५,कल्हाट,पो.भोयरे,मावळ ,पुणे) यांस मद्याचे बॉक्स घेऊन जाण्याकरिता आणलेला टाटा कंपनीचा 407 मालवाहतूक टेम्पो एमएच १४ एझेड ४९७५ सह अटक करण्यात आली.पारीठे याने दिलेल्या माहितीवरून पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाट्यावरील ब्लॉसम हॉटेल समोरच्या विको व्हॅली बी ९/ ३०२ येथे लेबले आणि लेबल छपाई साहित्य तसेच विलास सयाजी करवंदे याचे राहते घरातून विविध ब्रंडची लेबले मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली.

चारही अटक आरोपींसह गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन्ही चारचाकी मालवाहतूक वाहन मद्याचे बॉक्स लेबले व छापाई साहित्य असा एकूण अंदाजे किंमत १२ लाख ४८ हजार २४३ रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना गु.र.क्र. ३१/२०१८ दि.१५/०२/२०१८ अन्वये गुन्हा दाखल करून,शुक्रवारी जुन्नर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून कमी किंमतीचे दादरा नगर हवेली विक्रीस मान्यता असलेले विदेशी मद्य चढ्या दराने विक्री करून बक्कळ नफा कमविणाऱ्या टोळीला,मोठ्या किमतीच्या मुद्देमालासह गजाआड करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. राज्य उत्पादनशुल्क नारायणगाव आणि तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक दीपक परब, उपनिरीक्षक अनिल सुतार, रामचंद्र चवरे, संजय सराफ, नरेंद होलमुखे, सहायक उपनिरीक्षक रवींद्र भूमकर, जवान रोहीदास गायकवाड, प्रमोद पालवे, मुकुंद पोटे, राजू पोटे, अतुल बारंगुळे, संतोष गायकवाड, शिवाजी गळवे, अर्जुन भताने यांच्या पथकाने सदर कारवाई केली.गुह्याबाबत जवान रोहीदास गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास निरीक्षक परब करत आहेत.


बनावट दारूविक्रेत्यांचा सुळसुळाट 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावर दारू विक्रीस बंदी आल्या नंतर अधिकृत दुकाने बंद झाली असली तरी,मावळ,खेड,जुन्नर,आंबेगाव तालुक्यांतील महामार्गाकडेच्या हॉटेल ढाब्यांसह ग्रामीण भागातही सर्रास अवैध,बनावट आणि चढ्या दराने दारू विक्री चालू आहे.ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लेबल बदलून विक्री करणारी मोठी टोळी उत्तर-पश्चिम पुणे जिल्ह्यात कार्यरत असून,त्याला काहीसे राजकीय अभय मिळत असलयाने ग्राहकांच्या आरोग्यासह उत्पादनशुल्क विभागाच्या बुडणाऱ्या लाखोंच्या महसुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यामध्ये काही अधिकृत परमिट रम आणि मद्य विक्रेत्या दुकानांचाही समावेश आहे.एमआरपीपेक्षा चढ्या दराने देखील मद्य विक्री सुरूच आहे.अशा विक्रेत्यांवरही हद्दीबाहेरील पथकांद्वारे कारवाईची मागणी आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com