वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना ई-चलनाचा दणका

संदिप जगदाळे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

हडपसर : लाल सिग्नल असतानाही गाडी पळवणारे, झेब्रा क्रॅासिंगवर थाबलेल्या, वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे, अपघात करून पळ काढणारे, हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांकडून इ- चलनाद्वारे दंड वसूल करण्याची मोहिम हडपसर वाहतूक विभागाच्यावतीने मंगळवारपासून सुरू केली आहे. हडपसर वाहतूक विभागाने नाकाबंदी करून पहिल्याच दिवशी दोन तासात 38 वाहनांवर कारवाई करून 15 हजाराचा दंड वसूल केला. शहर वाहतूक शाखेकडून रोज अशाप्रकारे कारावाई होणार असल्याने नियम तोडणारे वाहनचालक चांगलेच धास्तावले आहेत. 

वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर वाहनचालकांवर आहे. आत्तापर्यंत नियम मोडणारे व सीसी टिव्हीत कैद झालेल्या वाहनचालकांना घरी नोटीस पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जात होती. वाहतूक पोलिसांची कमी संख्या, वाहन चालकांचे असहकार्य यामुळे, बदलेला पत्ता यामुळे या कारवाईत अनेक अडचणी वाहतूक विभागाला येत होत्या. त्यामुळे वाहतूक विभागाने वाहनचालकांना नाकाबंदीत थांबवून ई-चलन अॅपवर किती गुन्हे केले आहेत, याची तपासणी केली जात आहे. गुन्हे आढळल्यास त्याच ठिकाणी वाहन चालकांकडून दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. पोलिस लगेच आपण कितीदा व कोणते नियम मोडले याची माहिती तेथेच वाहनचालकाला देतात. गुन्हयांचे प्रमाण व स्वरूपानुसार तेथेच दंड वसूल करत आहेत. त्यामुळे दंडाची वसूली मोठया प्रमाणात होणार आहे. तसेच वाहनांची तपासणी केल्यानंतर आपण कितीदा नियम मोडला याची माहिती नागरिकांना मिळत आहे. ई-चलनमुळे दंडाची रक्कम वसूल करणेही सोपे होणार आहे.

हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, सिग्नलवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक उपआयुक्त कार्य़ालयातील नियंक्षण कक्षात पोलिस दिवस-रात्र  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवत आहेत. त्याची माहिती ई-चलन अॅपवर तातडीने या नियंत्रण कक्षातून टाकली जात आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येते, ई-चलन अॅपवर असलेल्या माहितीनुसार वाहन चालकांने जर नियम मोडला असेल तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. उपआयुक्तांनी मंगळवारपासून शहरातील सर्व वाहतूक विभागांना अशाप्रकारे नाका बंदी करून दंड वसूल करण्याचा आदेश दिला आहे. ही कार्यवाही नियमितपणे सुरू राहणार आहे.  

Web Title: Marathi news pune news e challan transport rules