रस्त्यावर लाईटची तार पडल्याने वाहन चालकांना शॉक

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 12 मार्च 2018

शिवणे (पुणे) : येथे औद्योगिक क्षेत्र परिसरात 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) रस्त्यावर पडल्याने जाणाऱ्या वाहन चालकांना शॉक बसला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 

शिवणे (पुणे) : येथे औद्योगिक क्षेत्र परिसरात 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) रस्त्यावर पडल्याने जाणाऱ्या वाहन चालकांना शॉक बसला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 

शिवणे गावातील कालव्याच्या रस्त्याने खान वस्तीकडे रस्त्या जातो. त्या रस्त्याच्या वरून औद्योगिक क्षेत्र परिसराला 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) जाते. आवाज होऊन ती वीज वाहिनी या रस्त्यावर अचानक खाली पडली. घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर शिर्के दुचाकीवरून तेथून जात होते. तू व्हीलर थांबा पुढे जाऊ नका. असे काही लोक त्यांना ओरडत होते. ते थांबले त्यांनी पाहिले असता. वीज वाहिनी रस्त्यावर पडली होती. त्यावेळी टेम्पो व दुचाकी चालक तेथून जात होते. त्यांना शॉक लागल्याची माहिती यावेळी नागरिकांनी सांगितल्याचे शिर्के यांनी 'सकाळ' शी बोलताना ही माहिती दिली. 

यावेळी, स्थानिक नागरिकांनी येथील स्थानिक , महावितरणचे अधिकारी वायरमन यांनी फोन करून घटनेची माहिती दिली. दरम्यान, ही वीज वहिनी वारजे परिसरात घरगुती व शिवणे औद्योगिक क्षेत्र परिसरात वीज पुरवठा केला जातो. तार पडल्यावर येथील उपकेंद्र ट्रीप होऊन बंद पडले. तर नागरिकांची माहिती मिळताच तातडीने घटना स्थळावर पोचून वीज वाहिनी रस्त्यातून बाहेर काढली. त्यानंतर रहिवाशी भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. ती वाहिनी जोडण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत केला. त्यानतर तेथे आणखी दोष दिसल्याने वीज वहिनी बंद करून ते साडे अकरा वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सध्या सुरु होते.
 

Web Title: Marathi news pune news electricity wire on road shock