सिंडिकेट एक्झॉस्ट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आक्रमक भूमिका

रामदास वाडेकर
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) : कोणतीच पूर्व सुचना न देता येथील सिंडिकेट एक्झॉस्ट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कर्नाटक येथील धारवाडला स्थलांतरित करण्याच्या कंपनी व्यवस्थापनाच्या निर्णयावर स्थानिक कामगारांना संताप व्यक्त केला आहे, कंपनीने व्यवस्थापनाने कामगारांशी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी अन्यथा कारखान्याच्या बाहेर एकही वस्तू काढू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

टाकवे बुद्रुक (पुणे) : कोणतीच पूर्व सुचना न देता येथील सिंडिकेट एक्झॉस्ट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कर्नाटक येथील धारवाडला स्थलांतरित करण्याच्या कंपनी व्यवस्थापनाच्या निर्णयावर स्थानिक कामगारांना संताप व्यक्त केला आहे, कंपनीने व्यवस्थापनाने कामगारांशी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी अन्यथा कारखान्याच्या बाहेर एकही वस्तू काढू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

19 वर्षांपूर्वी हा कारखाना येथे उभा राहिला, परिसरातील ५५ कामगारांनी रक्ताचे पाणी करून कारखान्याची भरभराट केली, बुधवार (ता. 31) पर्यंत कंपनीने कामगारांकडून सर्व कामे करून घेतली, सर्व कामाचे उद्दिष्ट पूर्ण करून घेतले आणि गुरूवारी (ता. 1) साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कंपनीच्या प्रवेशद्वारावर कारखाना स्थलांतरित करण्याची नोटीस बजावली. नोटीसवर संपर्कासाठी नारायण जाधव, प्रकाश कुलये यांचा संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिला असून सदर दोन्ही इसम याची या सहा दिवसात एकदाही भेट झाली नसल्याचे कामगारांनी स्पष्ट केले आहे. 

स्थानिक कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष असवले, नितीन भांगरे, अशोक शेटे, कृष्णा कुडकी, काळूराम घोजगे, संजय शिरसट, दिलीप गावडे, बाळासाहेब गुणाट, नवनाथ गाढवे, खंडू मोहिते यांच्यासह सर्व कामगारांनी तहसीलदार रणजित देसाई, वडगावचे  पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, कामगार आयुक्त यांना या कारखान्याने राबविलेल्या धोरणाच्या विरोधात लेखी निवेदन दिले असून मदतीची अपेक्षा केली आहे. 

कंपनीने स्थलांतरित करण्याच्या नोटीसा बजावल्याने सर्व कामगार दिवसात उन्हात आणि रात्री थंडीत कडक पहारा देत आहे. सकाळी सात वाजल्यापासून कामगार गेट बसून आहे. येथे पिण्यासाठी पाणी नाही की, बसायला सावली नाही.

अंकुश लोहट म्हणाले, "पूर्व कल्पना न देता कारखाना स्थलांतरित करण्याची नोटीस बजावली, प्रवेशद्वारावर सुट्टीत फलक लावून कारखाना बंद असल्याचे सांगितले. धारवाडला कारखाना स्थलांतरित करण्याची चर्चा सुरू आहे. 19 वर्षे काम केले मुले मोठी झाली आहे, त्यांचे शिक्षण, लग्न आणि कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कशी पार पाडायची. कारखान्याच्या धोरणाचा निषेध करतो. 

कारखाना कर्नाटकात स्थलांतरित झाला तर तेथील भाषेची मोठी अडचण निर्माण होईल, आमची मुले येथे मराठीत शिकत आहे, तिकडे गेल्यावर कन्नड मध्ये शिकवायची का? वयाची पंचेचाळीसी ओलांडली या वयात कुठे भटकंती करायची. 

येथील बहुतेक कामगार 19 वर्षापासून नोकरी करीत आहेत, पण कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटीसात त्यांची सेवा फक्त 8 ते 10 वर्षे झाल्याचे नमूद केले आहे, हे काय गौडबंगाल आमच्या लक्षात अजून आले नाही म्हणून कंपनीच्या व्यवस्थापनाने चर्चा करावी ही आमची मागणी आहे. कंपनीने स्थलांतरित होणाऱ्या ठिकाणी नोकरी करा किंवा सरासरी 70 हजार ते 1 लाख 50 हजाराप्रमाणे रक्कम घ्या असा पर्याय सुचविला आहे. 

या कारखान्यात वाशेरेचे लक्ष्मण चिमटे कामाला होते, सासू सासऱ्यांना मुलगा नसल्याने तेच त्यांचा आधार होते, सासरा जवाई एकत्रितपणे तळेगाव येथे राहत होते. सासू सासरे पत्नी तीन मुलांना घेऊन गुण्यागोविंदाने राहणारे चिमटे गुरूवारी (ता. 1) रात्री उशीरा घरी आले, कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद केल्याचे सांगितले, ही बातमी त्यांच्या 65 वर्षीय बबन मेचकर या सासऱ्यांनी ऐकली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला, शुक्रवार (ता. 2) त्यांची प्राणज्योत मालवली. 

यापूर्वी या औद्योगिक क्षेत्रातील इन्डूरनस कंपनी चाकण आणि रांजणगावला स्थलांतरीत झाली, मागच्या महिन्यात महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामावर काढून टाकलेल्या कामगारांच्या पत्नीनी एल्गार उभा केला होता. आता सिंडीकेट कंपनी स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे स्थानिक कामगारांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: Marathi news pune news employees sindicate exost system pvt limited