विद्यार्थ्यांचा “एम्प्रेस गार्डन बचाव” मोहिमेस सक्रिय पाठिंबा

संदिप जगदाळे
शुक्रवार, 9 मार्च 2018

हडपसर (पुणे) : वानवडी येथील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी “एम्प्रेस गार्डन बचाव” मोहिमेस सक्रिय पाठिंबा दिला.

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयातील सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी विद्यालयापासून एम्प्रेस गार्डन पर्यंत एम्प्रेस बचाव, पर्यावरण बचाव अशा घोषणा देत पायी फेरी काढली व निषेध नोंदविला. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्व हस्तक्षरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे लिहून एम्प्रेस गार्डन वाचाविण्याविषयी विनंती केली.

पुणे शहराची शान असलेले व १५० वर्षांची परंपरा असलेले एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन शासकीय अधिकाऱ्यांसाठी निवास स्थाने बनविण्याकरिता नष्ट करणे विचारधीन आहे. हे गार्डन म्हणजे वनस्पतींच्या जैवविविधतेचा उत्तम नमुना आहे. या उद्यानामध्ये जगभरातील विविध दुर्मिळ वनस्पती आहेत. विविध वनस्पतींचा अभ्यासक ही या ठिकाणी येत असतात. एम्प्रेस गार्डनमध्ये विविध प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. एम्प्रेस गार्डन हे सर्व धर्मियांचे प्रियस्थान आहे. अनेक विद्यालयांच्या सहली या ठिकाणी येत असतात. हे गार्डन नष्ट केल्याने पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. एम्प्रेस गार्डनमुळे आजूबाजूच्या परिसराला महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणून विविध सामाजिक संस्थाच्या वतीने एम्प्रेस बचाव ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

याप्रसंगी प्राचार्य लहू वाघुले सर, गोरक्षनाथ केंदळे, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, मच्छीद्र रकटे, अरविंद शेंडगे, दीपा व्यवहारे, घनशाम पाटील, आशा भोसले, नलिनी गायकवाड, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे इ. शिक्षक तसेच दीपक जांभूळकर, कमल लोखंडे, कैलास वाडकर, विवेक कांबळे आदी शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news empress garden keep safe