हडपसर मेडिकल असोसिएशनचा विरोध, एम्प्रेस गार्डनला पाठींबा

संदिप जगदाळे
सोमवार, 12 मार्च 2018

हडपसर (पुणे) : एम्प्रेस गार्डन-पुण्याचे ग्रीन हेरिटेज आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरामध्ये काँक्रीटच्या जंगलात गर्द झाडी व महाकाय वेलींनी आपले वेगळेपण जपलेले उद्यानाच्या जागेवर "सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासासाठी इमारती बांधणे म्हणजे सरकारला सुचलेली दुर्बुध्दी आहे. पुण्याच्या जैविक विविधतेमध्ये अत्यंत महत्वाचे योगदान एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनने दिले आहे.

हडपसर (पुणे) : एम्प्रेस गार्डन-पुण्याचे ग्रीन हेरिटेज आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरामध्ये काँक्रीटच्या जंगलात गर्द झाडी व महाकाय वेलींनी आपले वेगळेपण जपलेले उद्यानाच्या जागेवर "सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासासाठी इमारती बांधणे म्हणजे सरकारला सुचलेली दुर्बुध्दी आहे. पुण्याच्या जैविक विविधतेमध्ये अत्यंत महत्वाचे योगदान एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनने दिले आहे.

२५० च्या वर वृक्षांच्या प्रजातींचा सांभाळ येथील ३७ एकरांतील जागेत कित्येक वर्षांपासून होत आहे. पुण्यातील 'वृक्षांचे वन' अथवा 'आर्बोरेटम' म्हणता येईल असे बरेच मोठे वृक्ष इथे आहेत. त्यांचे जतन करणे हे पुणेकरांसाठी आवश्यक बाब आहे. त्यामुळे आम्ही या निर्णय विरोधात न्यायालयात देखील धाव घेवू असे मत डॅा. चेतन म्हस्के म्हणाले, हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने एमप्रेस गार्डन वाचविण्यासाठी पाठिंबा देण्यात आला. यात 100 डाॅकटर सहभागी झाले होते, याप्रसंगी डॅा. म्हस्के बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. अशोक जैन, सचिव डॅा. सचिन आबणे, कोषाध्यक्ष डॅा. प्रशांत चौधरी ,उपाध्यक्ष डॅा. शंतनु जगदाळे, डॅा. अमर शिंदे डॅा. मंगेश वाघ,डॅा. मंगेश बोराटे, डॅा. राहूल झांजुणॆ, डॅा. सुनिता घुले, डॅा. वंदना आबणे, डॅा. गणपत शितोळे, डॅा. सुहास लांडे, डॅा.जयदीप फरांदे डॅा. सतिश सोनवणे, डॅा. चेतन महसके, डॅा. दिपक भोसले, , डॅा. सचिन जाधव, डॅा. योगेश सातव, डॅा. कमलाकर गजरे, डॅा. अजय माने, डॅा. राजेंद्र सांळुखे व इतर सहभागी झाले. यावेळी सचिव सुरेश पिंगळे यांना पाठिंबाचे पत्र देण्यात आले.

डॅा. जैन म्हणाले, एम्प्रेस गार्डन मधील वृक्ष संपदेबरोबरच विविध पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हे उदयान म्हण्जे शहराचे फुफुस आहे. 'सिटी बायोडायव्हर्सिटी' या संकल्पनेनुसार विविध शहर आपापल्या हद्दीत 'बायोडायव्हर्सिटी पार्क', 'बायोडायव्हर्सिटी हब' सारखे विविध उपक्रम राबवित आहेत मा त्र एम्प्रेस गार्डन'च्या साडेदहा एकर जागेवर शासकीय निवासस्थानासाठी इमारती बांधण्याचा सरकारने घातलेला घाट याला पुणएकरांचा तिव्र विरोध आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी हडपसर मेडिकल असोसिएशन रसत्यावर उतरेल. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, असे मत डॅा. चेतन म्हस्के यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Marathi news pune news empress garden oppose of hadapsar medical association