पुणे - चिंचवडमध्ये माजी नगरसेवकावर मारहाणीचा गुन्हा 

संदीप घिसे 
शनिवार, 3 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व तीन जणांनी एकास मारहाण केल्या प्रकरणी केली चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत कोऱ्हाळे, चंद्या, चंद्याचा भाऊ आणि प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सागर रमेश कोंडे (वय 42, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी कोंडे हे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळील अरिहंत हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला परत आलात, परत येथे आलात तर तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातऱ्या असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्‍यात मारहाण केली. अनंत कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर चंद्याच्या भावानेही लाथा मारल्या. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले करीत आहेत. 

कोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला व शिवसेनेच्या तिकिटावर चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला

Web Title: Marathi news pune news ex corporator fighting