बोगस डॉक्टर शोध समितीने पकडला जुन्नरमध्ये बनावट डॉक्टर 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : घाटघर ता. जुन्नर येथे वैद्यकीय उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी रंगेहाथ पकडले. आज बुधवारी (ता. 31) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. बोगस डॉक्टरचे नाव सुभाष हरेकृष्णा हलदार असे असून तो मूळचा कलकत्त्याचा राहणारा आहे. त्याने घाटघर येथील आधार कार्ड काढले आहे. 

बोगस डॉक्टरच्या खुलेआम प्रॅक्टीसमुळे व वावरामुळे आदिवासी भागातील गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक लूट करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर परिसरातील अंजनावळे, निमगिरी व अन्य ठिकाणी अजूनही काही बोगस डॉक्टर असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत अधीक महिती अशी की, जुन्नरच्या आदिवासी भागातील घाटघर येथे घरकुल लाभार्थ्यांच्या कामाची क्षेत्रीय तपासणी करण्यासाठी जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे, विस्तार अधिकारी सुखदेव साळुंके, ग्रामसेवक आर.के.जाधव, गृह निर्माण अभियंता अक्षय लांडगे, सुरेश नवले हे गेले होते. घरकुलाची पाहणी करताना येथील रहिवासी युवराज वामन लांडे यांच्या घरात बोगस डॉक्टर सुभाष हरेकृष्णा हलदार हा गेली तीन वर्षांपासून अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे शिक्षण दहावी असून तो या ठिकाणी खासगी प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याच्याजवळील औषधे व अन्य मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी गाढवे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news pune news fake doctor