पुणे- हडपसरमध्ये ‘फॅन्सी नंबर प्लेट’ विरूध्द मोहीम

संदिप जगदाळे
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : हडपसर वाहतूक पोलिसांनी ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध व कर्कश्श हॅार्न व सायलेन्सर वाजविणाऱ्या वाहन चालकांविरूध्द कारवाईची मोहिम सुरू केली आहे. जागेवरच या नंबर प्लेट काढून टाकण्याची कारवाई केली जात आहे. यामध्ये दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनधारकांनी रंगीबेरंगीसह विचित्र आकारातील क्रमांकाच्या पाट्या (फॅन्सी नंबर प्लेट्‌स) तातडीने बदलाव्यात. नंबर प्लेट बनविणाऱ्यांनीही फॅन्सी नंबर प्लेट बनवू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक शाखेच्यावतीने देण्यात आला आहे. 

कै. अण्णासाहेब मगर महाविद्यालय, एस. एम जोशी महाविद्यालयात या परिसरात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी फॅन्सी नंबर प्लेट लावतात. तसेस मोठ्याने कर्कश्श आवाजात मोठयाने प्रेशर हॅार्न वाजवतात. याबाबत अनेकदा तक्रारी आल्यानंतर महाविद्यालयीन परिसरात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून फॅन्सी नंबर प्लेट व प्रेशर हॅार्न व सायलेंसर बसविलेल्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. 

हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदा आहे. आरटीओच्या नियमांनुसार ठराविक नमुन्यातीलच नंबर प्लेट वाहनावर असणे अपेक्षित आहे. मात्र, वाहनचालक अनेकदा आकर्षक आणि चित्रविचित्र नंबर प्लेट वाहनांवर लावतात. त्यामुळे अनेकदा वाहनाचा क्रमांक व्यवस्थित कळत नाही. अपघात झाला किंवा अपघातसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्या वाहनाचा क्रमांकही नागरिकांना व्यवस्थित टिपता येत नाही. अनेकदा वाहनांवर भाऊ, दादा, आप्पा, आई, साई, किंग, आण्णा आदी अक्षरे क्रमांकांच्या माध्यमातून तयार केली जातात. यापुढे अशा वाहन चालकांवर व फॅन्सी नंबर प्लेट बनविणाऱ्या कारागीरांवर कारवाई सातत्याने करण्यात येईल. 
 
Web Title: Marathi news pune news fancy number plate action traffic police