वंचित शेतकऱ्यांची होणार पडताळणी

Farmer
Farmer

पुणे - कर्जमाफी, एकवेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभासाठी अर्ज केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्ज व बॅंकांची माहिती जुळत नसल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. कर्जमाफी व अन्य लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी केली जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. 

ऑनलाइन अर्ज व बॅंकांकडील माहितीची जुळणी होत नसल्याने कर्जमाफीपासून वंचित असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एक लाख दोन हजार १८४ जणांची यादी बॅंकेला प्राप्त झाली आहे. तिची विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत पडताळणी केली जात आहे. त्यानंतर बॅंकांमार्फत ही यादी तालुकास्तरीय समितीकडे पाठविणार आहे. सहकार विभागाचे सहायक उपनिबंधक, शासकीय लेखापरीक्षक, विभागीय अधिकारी, जिल्हा बॅंकेच्या विकास अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. तालुकास्तरीय समितीच्या पडताळणीनंतर पात्र व अपात्र शेतकऱ्यांची नावे सरकारला कळविणार आहेत. 

लाभापासून वंचित असलेल्या शेतकरी अर्जदारांची तालुकानिहाय संख्या : आंबेगाव ८४६०, बारामती १३८४९, भोर २१५९, दौंड १०६४६, हवेली ४६०४, इंदापूर १३५३९, जुन्नर ८०७३, खेड ७८०३, मावळ ३८८६, मुळशी २०६०, पुरंदर ८६०८, शिरूर १५७५५ व वेल्हा २७४१. 

बॅंकेत संपर्क साधण्याचे आवाहन 
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना यादी पडताळणीसाठी सोमवारपर्यंत (ता. ५) मुदत दिली आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी बॅंकेत संपर्क साधावा. नियमित कर्ज परतफेड केलेल्यांना एकवेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभ योजनेचा फायदा देण्यासाठी थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक रुपयांचा भरणा बॅंकेत करावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com