पुणे : शेतकर्‍यांनी स्वखर्चाने बनविला पुल 

समीर तांबोळी 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

 उंड्री (पुणे) : महंमदवाडी-तरवडे वस्ती येथील शेतकर्‍यांनी स्वखर्चाने जुन्या ओढ्यामध्ये जलवाहीनी टाकून पुल तयार केला आहे. शासनाच्या मदतीची अथवा शासनाकडून काम पूर्ण होण्याची वाट न पहाता स्वखर्चाने हे काम करून त्यांनी तरुणांसमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. महंमदवाडी पंचक्रोशीतील सर्व स्तरातून या कामाचे कौतूक होत आहे. 

महंमदवाडीतील सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे, तसेच तरुण शेतकर्‍यांना ही कल्पना सुचली. त्यांनी परिसरातील ज्येष्ठ शेतकर्‍यांसमोर हा विचार मांडला. त्यावेळी सर्वानुमते ओढ्यामध्ये जलवाहीनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य अडसर निधी गोळा करण्यासंबधीचा होता. शेतकर्‍यांनी विचारविमर्श करून शासनाची मदत न घेता स्वखर्चाने हे काम करण्याचा निर्णय घेतला व जलवाहीनी टाकण्याचे काम पुर्ण करण्यात आले. 125 मीटर लांबीची जलवाहीनी टाकण्याच्या कामासाठी साधारणपणे तीन लाख खर्च झाला. 

या कामात स्वत: अतुल तरवडे, तसेच सोपान लोंढे,नारायण तरवडे, संदिप जरांडे, मयुर तरवडे, सुधीर जरांडे, शांताराम जरांडे, काळूराम जाधव , लंकेश तरवडे, नंदू जाधव, अनिल जाधव, प्रदिप डांगमाळी, अनंता तरवडे, प्रतिक जरांडे सहभागी झाले.
 
Web Title: Marathi news pune news farmers bridge own expenditure

टॅग्स