चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारावर गोळीबार 

संदीप घिसे
मंगळवार, 20 मार्च 2018

पिंपरी - चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारांवर गोळीबार झाला. ही घटना मंगळवारी (ता.२०) पहाटे वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली. जयंत भगवंत चितळकर (वय ३०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास चितळकर हा आपल्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी शिवाजी चौक वाल्हेकरवाडी येथे बसला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या दंडाला गोळी चाटून गेली आहे. मात्र आपल्याला सळई लागल्याचे सांगत याबाबत त्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला. यामुळे पोलिस स्वतःहून याबाबत गुन्हा दाखल करीत आहेत.

Web Title: marathi news pune news firing crime