सणसवाडीत अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

शिरुर (पुणे) : सणसवाडी (ता. शिरुर) येथे अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात गंगाराम बाबूराव दासरवाड (वय 27, रा. शिकारा, ता. मुखेड, जिल्हा. नांदेड) यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला. सणसवाडीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मृत दासरवाड हा सणसवाडीत कॅन्टीन चालवित होता. तसेच इतर छोट्या हॉटेलना चपात्या पुरवीत होता. 

चपात्या घेऊन मोटारसायकल वरुन जात असताना सणसवाडीतील स्मशानभूमीजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला. दासरवाड यांना तीन गोळ्या लागल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. हल्लेखोर हे परप्रांतीय असल्याचे समजते. पोलिसांनीही या शक्यतेला दूजोरा दिला आहे. हल्ल्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Marathi news pune news firing in sanaswadi one dies

टॅग्स