मावळातील कुसूरमध्ये कपडे व अन्नदान उपक्रम 

रामदास वाडेकर
मंगळवार, 30 जानेवारी 2018

टाकवे बुद्रुक : मावळ तालुका युवक एकता मंच आणि जैन युथ क्लब यांच्या वतीने आंदर मावळातील कुसूरच्या मोरमारेवाडीत नवीन कपडे व अन्नदान करण्यात आले आहे. गेल्या अकरा वर्षापासून ही सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. मावळ युवक एकता मंचाचे सचिव कुणाल ओव्हाळ यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. 

नारायण ठाकर, कैलास गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी सोमनाथ गायकवाड, किशोर सातकर, मावळ तालुका युवक एकता मंचचे विलास गायकवाड, संपत शेटे, कुणाल ओव्हाळ, सचिन खिलारे, सचिन भाडे, आबाजी शेळके, गणेश साबळे, मित्तल सातकर, नवनाथ साबळे, उपस्थित होते. जैन युथ क्लबचे अध्यक्ष मुकेश मुथा यांनी स्वागत केले. लक्ष्मण शेलार यांनी सूत्रसंचालन केले. अनिल सातकर यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news pune news food and cloth donation