भक्तिमय वातावरणात गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

रमेश मोरे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे श्री संत गजाजन महाराज प्रगटदिनानिमित्त आठवडाभरापासुन सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत गजानन महाराज प्रगटदिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गजानन महाराज मंदीरात सकाळपासुनच विविध धार्मिक कार्यक्रमांने उत्सवाची सुरूवात करण्यात आली. साई आर्टस्‍तर्फे श्री गजानन महाराजांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती.

येथील साई आर्टस क्लासेसतर्फे श्री गजानन महाराज यांची सुंदर प्रतिकृती रांगोळीतून साकारण्यात आली होती. ४ बाय ८ फुट जागेत साकारलेल्या या रांगोळीस काढण्यास बारा कलाकारांना ४८ तास लागले आहेत. ही रांगोळी श्री प्रमोद सदाशिव आर्वी आणि त्यांच्या अकरा सहकाऱ्यांनी पूर्णत्वास नेली आहे. या कामी  अमेय अळसुंदकर, रोशन पाटील, संध्या खंडाळकर, मधुरा घुले, अनिता केदारी, सुलभा गणगे, सुभद्रा पंडीत, ऋषीकेश वाळुंजकर, संदीप सोनी, तेजस्वीनी तावरे या कलाकरांनी योगदान दिले आहे.

श्री गजानन महाराजांच्या प्रतिकृतीची हुबेहुब रांगोळी बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याचबरोबर सप्ताहात किर्तनकार आबा महाराज गोडसे, बाबुराव महाराज तडसे, महंत पुरूषोत्तम महाराज पाटील, रविंद्र महाराज हरणे, सुदाम शास्त्री, संतोष महाराज पायगुडे, विश्वनाथ महाराज कोल्हे, नितिनदास महाराज यांची किर्तने झाली.तर प्रसिद्ध बासरी वादक पंडित केशव गिंडे यांचे शिष्य श्री अझरूद्दीन शेख यांचे या सोहळ्यात बासरीवादन झाले. सकाळी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण करण्यात  आले. मुखोद्गत पारायणकर्ते विद्याधर जोशी व सांगवीकर भाविकांनी पारायण केले. दुपारी श्रींची आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. आज गुरूवार (ता. 8) काल्याचे किर्तन होईल. काल्याच्या महाप्रसादानंतर सायंकाळी श्रींची पालखी दिंडी नगर प्रदक्षिणा व आरतीनंतर उत्सवाती सांगता करण्यात येईल.

Web Title: Marathi news pune news gajanan maharaj