garbage
garbage

कचरा जाळणे धोकादायक; आरोग्याचा प्रश्न गंभीर

हडपसर : हांडेवा़डी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल.

नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार रोज भारतात १.३३ लाख टन कचरा निर्माण होतो, पकी फक्त २६ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. बाकी नुसताच टाकला जातो, ज्याच्यासाठी वर्षांला १२४० हेक्टर जमीन लागणार आहे. याचा आपण नागरिक विचार करणार आहोत का?

सविता मोरे म्हणाल्या, तुमच्या खिडकीच्या समोर तुम्हाला कचराकुंडी ठेवलेली आवडेल का? या प्रश्नावर तुम्ही ‘नाही! मुळीच नाही!’ असे स्पष्टपणे सांगाल. याचे कारण स्पष्ट आहे. मग लोकांच्या अंगणात कचरा जाळला तर नागरिक सहन का करतील? आणि त्याही वरती कचरावेचक साठलेल्या, कुजणाऱ्या कचऱ्यात कसे काम करत असतील याचा विचार आपण कधी केलाय? म्हणूनच कचरा व्यवस्थापनाकडे व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

डॅा.शंतनू जगदाळे म्हणाले, कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. फोम कप्स, अंडय़ाचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. डॉक्झिनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते.

जावाजी थिटे म्हणाले, अनेक सफाई कर्मचारीच कचरा पेटवून देताना दिसतात. त्यामुळे सकाळी या भागात सर्वत्र धूर पसरलेला असतो. त्याची झळ परिसरातील झाडांना बसते. रस्त्याने जाणारे नागरिक आणि रहिवाशी यांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांना सूचना देण्याची आणि कारवाई करण्याची गरज आहे

संदेश झेंडे ब्राझील, चीन आणि मेक्सिकोबरोबरच मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही वरचा क्रमांक लागतो.   

२०११च्या जनगणनेनुसार आपल्या देशातील ३० टक्के नागरिक शहरी भागात राहतात. ४६८ शहरी वसाहतींमध्ये १०० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली तीन शहरे आणि दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेली ५३ शहरे आहेत. आणि म्हणूनच घन कचरा व्यवस्थापन हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे.

दिपाली कवडे म्हणाल्या, आतापर्यंत पर्यावरणावर गोड गोड बोलणाऱ्या भारताने कृतिशील ब्राझील देशाकडून शिकण्याजोगे खूप आहे. ब्राझीलमध्ये धोरणात्मक आराखडा तयार करून कचरावेचकांच्या सहकारी संस्था स्थापणे आणि संघटन;  जागा, आणि सुरक्षिततेसाठी देणे; गाडय़ा देणे आणि शेड उभारणे; सुलभ पत आणि सामाजिक सुरक्षा अशा गोष्टी केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राझील कचरावेचकांना प्रतिकिलोमागे सरकारी निधीतून पर्यावरण सेवा शुल्क देते. हे मालाच्या बाजारी किंमतीच्या पेक्षा वेगळे आहे शिवाय वेचकांना मालाचा बाजारी भावदेखील मिळतो. ब्राझीलबरोबर बऱ्याच गटांमध्ये सहभागी होणारा भारत या बाबतीत किती कृती करेल हे बघण्याजोगे आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com