टिळेकर हा विकासाचा ध्यास घेतलेला आमदार - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

मांजरी - 'भाजप पक्षाचा जाहीरनामा नसतो, तर वचननामा असतो आणि वचन हे पूर्ण करायचे असते ते वचन पूर्ण करण्यासाठी आमदार योगेश बांधील आहे. पुणे-हडपसर भागाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची शपथ घेवून तो राजकारणात आला आहे. ते शपथ पूर्तीचं राजकारण, वचन पूर्तीचं राजकारण आमदार योगेश टिळेकरच्या माध्यमातून येथे होत आहे. त्याच्या विधानसभेला पाच वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा हडपसर भागातील सर्व कामे पूर्णत्वाला गेलेली असतील.

मांजरी - 'भाजप पक्षाचा जाहीरनामा नसतो, तर वचननामा असतो आणि वचन हे पूर्ण करायचे असते ते वचन पूर्ण करण्यासाठी आमदार योगेश बांधील आहे. पुणे-हडपसर भागाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची शपथ घेवून तो राजकारणात आला आहे. ते शपथ पूर्तीचं राजकारण, वचन पूर्तीचं राजकारण आमदार योगेश टिळेकरच्या माध्यमातून येथे होत आहे. त्याच्या विधानसभेला पाच वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा हडपसर भागातील सर्व कामे पूर्णत्वाला गेलेली असतील. अशी ग्वाही देऊन शहर, हडपसर मतदारसंघ आणि महाराष्ट्रात युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून योगेश चांगले काम करतो आहे,' अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आमदार योगेश टिळेकर यांचे कौतुक केले. 

हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काळेपडळ येथील मैदानात आयोजित स्नेहमेळाव्यात पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार भीमराव तापकीर, आमदार बाळा भेगडे, भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुभाष जंगले, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेवक मारूती तुपे, नगरसेविका उज्वला जंगले, नगरसेवक संजय घुले, वीरसेन जगताप, वृषाली कामठे, राणी भोसले, लता धायरकर, पुणे कृषि बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, चेतन टिळेकर, संदीप दळवी, गणेश घुले, रणजीत रासकर, शिवराज घुले, सुनील धुमाळ, संदीप लोणकर, संजय सातव आदींसह अभिष्टचिंतन व स्वरविहार कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील मैदानात पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल अभिजीत कटके याचा सत्कार आमदार टिळेकर मित्र परिवाराकडून करण्यात आला. 

पालकमंत्री बापट पुढे म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात पहिले प्राधान्य हडपसरच्या मेट्रोला असेल. याशिवाय हडपसर कचरामुक्‍त केले जाईल. चोवीस तास पाणी देण्याचे नियोजनही लवकरच पूर्ण होईल. युवा मोर्चा संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तरूणांचे संघटन मजबूत करताना तितक्‍याच ताकदीने आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी आग्रही राहणाऱ्या आमदार योगेश टिळेकरांना या भागाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाहीही बापट यांनी दिली. गेली अनेक वर्षापासून रखडलेला सय्यदनगर-ससाणेनगरचा रेल्वेक्रॉसिंगचा प्रश्‍न मार्गी लागला असून त्यासाठी 11 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात दोन अडरपास येथे होत आहेत. येथे होणाऱ्या अंडरपाससह हडपसरपर्यंत मेट्रो धावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

तर आमदार राजकारणात महाराष्ट्र केसरी...
पालकमंत्री बापट म्हणाले की, राजकारणातील कुस्त्याही तुमच्याकडून शिकल्या पाहिजेत. कधी कोणाचा पट काढावा कधी कोणाला धोबीपछाड टाकावी हे राजकारणात योगेशला जसे कळते. महाराष्ट्र केसरी कटकेंना कुस्तीच्या खेळात कळते त्यामुळे खेळात कटके तर राजकारात आमदार टिळेकर महाराष्ट्र केसरी झाले आहेत, अशी मिश्‍किल टिपण्णी पालकमंत्री बापट यांनी केली. महाराष्ट्र केसरी जिंकणारे मल्ल नाहीत. पण गल्ली बोळात कुस्ती करून रेवड्या हातात घेऊन जनतेची सेवा करणारे आम्ही मल्ल आहोत, असेही ते म्हणाले.
 

Web Title: Marathi news Pune News Girish Bapat Yogesh Tilekar Birthday Program