सरकारी इमारतींमध्ये सौरऊर्जेचा पडणार प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - सौरऊर्जा वापराची प्रणाली आत्मसात करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनुकरणीय असे मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (पीएससीडीसीएल) या क्षेत्रातील आघाडीच्या तीन कंपन्यांसोबत स्वतंत्र सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व सरकारी इमारतींवर सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणाऱ्या टीईपी सोलर, क्‍लीनमॅक्‍स एन्व्हायरो एनर्जी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड आणि आदित्य ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत करार करून शहर व परिसरात रूफटॉप फोटोव्होल्टाइक सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी कंपनीतर्फे प्रतिनिधित्व केले.

शहरातील सरकारी कार्यालयांत सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाच्या प्रक्रियेत तिन्ही कंपन्यांनी पुणे स्मार्ट सिटीमध्ये काम करण्यास तयारी दर्शविली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत १० टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केलेली असावी, असे म्हटले आहे. या अनुषंगाने स्मार्ट सिटी प्रस्तावाचा एक भाग म्हणून, सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून दिलेले लक्ष्य पार करून, त्यापेक्षा अधिक म्हणजेच १५ ते २० टक्के वीजनिर्मिती करण्याचे पुणे स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट आहे. हे प्रमाण वाढवून पुणे शहराला १ गिगावॉट ऊर्जेतून वीजनिर्मिती करणारे देशातील पहिले शहर बनविण्याची पुणे स्मार्ट सिटीची महत्त्वांकाक्षा आहे.

Web Title: marathi news pune news government building solar power light