शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे - सुप्रिया सुळे

संतोष आटोळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

शिर्सुफळ : शासनाने आत्ता पर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजार भाव दिलेला नाही. शासन फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. दुधाचे दरही कमी केले आहे. यामुळे दुधाला योग्य तो भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करु असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

शिर्सुफळ : शासनाने आत्ता पर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजार भाव दिलेला नाही. शासन फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. दुधाचे दरही कमी केले आहे. यामुळे दुधाला योग्य तो भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करु असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामतीच्या जिरायती पट्यातील बऱ्हाणपुर, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, सोनवडीसुपे, उंडवडीसुपे, खराडेवाडी या गावांना भेट देऊन लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच विविध विकासकामांची उद्धाटन कार्यक्रम प्रसंगी तसेच नेपतवळण ग्रामपंचायत बऱ्हाणपूर येथे आद्यक्रांतीवर उमाजी नाईक समाजमंदीराच्या भूमीपुजनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.

या प्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, तालुका महिला अध्यक्षा वनिता बनकर, युवक अध्यक्ष राहुल वाबळे, दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप, पं.स.गटनेते श्री.प्रदिप धापटे यांच्यासह संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या सर्वांनी गावातील गटतट बाजूला ठेवून गाव विकासास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तर उंडवडी सुपे  येथील कार्यक्रमात पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची सोय करावी, संत तुकाराम महाराज पालखी तळावर सभामंडप बांधणे, बाजार तळावर ओटे बांधणे, भानोबा रस्ता मुरुमीकरण करणे,  मुंजाबा नगर येथे अंडरग्राउंड गटर व काँक्रीट रस्ता करणे, अंगणवाडी इमारत बांधणे, समाजमंदीर वॉलकंपाउंड करणे, समाज मंदिरासमोर पेव्हरब्लॉक बसविणे इत्यादी विकास कामे करण्याचे निवेदन ग्रामपंचायतीमार्फत खासदार सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले. 

यावेळी सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, ग्रामसेवक विनोद आटोळे, सदस्या मंगल गवळी, अंजना गवळी, रेणुका गवळी, रंजना गवळी, सुनिता माकर, ज्ञानदेव जगताप, बापुराव गवळी व ग्रामस्त उपस्थित होते.
 तर नेपतवळण येथे मिराताई चांदगुडे यांच्या हस्ते सुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच योगेश जाधव, ग्रामसेवक नवनाथ बंडगर, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंदर चांदगुडे, गावचे पोलीस पाटील बाळासाहेब गवळी यांच्यासह, युवक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Marathi news pune news government misleads farmers