पुणे जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरवात

पुणे जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरवात

शिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील 99 ग्रामपंचायतीपैकी बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी व मावळ तालुक्यातील उढेवाडी या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता उर्वरित 97 ग्रामपंचायतीच्या सन 2017 ते 2022 च्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडीसाठी मंगळवार (ता.26) रोजी मतदानाला सुरवात झाली. 

या ग्रामपंचायतीमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी (ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे निरगुडसर (ता. आंबेगाव), जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांचे पिंपळवंडी (ता. जुन्नर), जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांचे बुचकेवाडी (ता. जुन्नर),  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांचे पारवडी( ता.बारामती) आदी नेत्यांच्या गावांच्या ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यात आपापल्या गावाचा गड राखण्यासाठी या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केल्या प्रमाणे जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुक कार्यक्रमात जिल्ह्यातील इंदापूर तालुका वगळता उर्वरित बारा तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींचा समावेश आहे..यामध्ये बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी व मावळमधील उढेवाडी या दोन ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 97 ग्रामपंचायतीपैकी 13 गावाच्या सरपंच पदाच्या तर सदस्य पदाच्या 304 जागा बिनविरोध झाल्या आहेत. या भागांमध्ये काही ठिकाणी फक्त सदस्य पदासाठी तर काही ठिकाणी फक्त सरपंच पदासाठी मतदान होत आहे.

मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतीचा तालुका व गावे खालील प्रमाणे..
1) हवेली - (9 गावे) - भिलारवाडी, फुलगाव, गुजर निंबाळकरवाडी, कोलवडी साष्टे, जांबुळवाडी- कोडवाडी, खामगाव मावळ, मांगडेवाडी, वाडेबोल्हाई, वाघोली
2) मावळ - (7 गावे) - साळुंब्रे, आढले बुद्रुक, डोणे, मळवंडी ढोरे, बेबड ओव्हळ, आंबळे, शिंळींब, 
3) आंबेगाव - (9 गावे) - चांडोली खुर्द, जारकरवाडी, पहाडदरा, कुशीरे बुद्रुक, निरगुडसर, जाधववाडी, कोलतावडे, पिंपरगणे, चास
4) दौंड (1 गाव) -  मलठण
5) वेल्हे ( 4 गावे) - आंबवणे, कांदवे, करण बुद्रुक, मानगाव
6) बारामती (15 गावे) - मानाप्पाची वाडी, धुमाळवाडी, डोर्लेवाडी, पारवडी, मुढाळे, सिध्देश्वर निंबोडी, मेडद, पवईमाळ, काटेवाडी, आंबी बुद्रुक, गुणवडी, कऱ्हावागज, करंजेपुल, गाडीखेल, चौधरवाडी
7) मुळशी - (15 गावे) - वांतुडे, भांबर्डे, शेडाणी, जामगाव, बेलावडे, भादस बुद्रुक, जातेडे, धामण ओव्हळ, आंबवणे, मुगाव, डावजे, वाद्रे, खुबवली, कोंढावळे, वडगाव, 
8) भोर ( 10 गावे) - कांबरे बुद्रुक, जयतपाड, नांदगाव, वडतुंबी, टिटेघर, पळसोशी, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, कुरुंजी, माळेगाव,
9) शिरुर (1 गाव) - राजंणगाव सांडस,
10) खेड (2 गावे) - होलेवाडी, निघोज,
11) पुरंदर (2 गावे) - गुळुंचे, कर्नलवाडी
12) जुन्नर (22 गावे) - पांगरी त.मढ., आंबेगव्हाण, बांगरवाडी, बुचकेवाडी, धालेवाडी, डुंबरवाडी, गुळुंचवाडी, कांदळी, खामगाव, खटकाळे, नारायणगाव, निमगिरी, पाडळी, पिंपळवंडी, पिंपरी कावळा, राळेगण, सागणोरे, शिरोली तर्फे आळे, सुकाळवेढे, उंब्रज नं 1, मानमळा, वडगाव आनंद..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com